तांदळाच्या आपल्याकडे भरपूर जाती आहेत. परंतु या सगळ्यांमध्ये असे काही तांदळाचे प्रकार आहेत, जे वजन कमी करण्यात मदत करतात. या लेखात आपण अशाच काही चार प्रसिद्ध तांदळाच्या प्रकारांबद्दल माहीती घेऊ जे लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतात.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त तांदळाच्या लोकप्रिय प्रकार
1- तपकिरी तांदूळ- आहारातील फायबर समृद्ध, तपकिरी तांदूळ चयापचय वाढवतो. या मध्ये प्रति 100 ग्रॅम मध्ये 111 कॅलरीज असतात.
पांढऱ्या तांदूळ पेक्षा शिजायला थोडा जास्त वेळ लागत असला तरी ते खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, शरीराला पुरेसे बी जीवनसत्व मिळवण्यासाठी आणि स्ट्रोक, हृदयरोग आणि टाइप 2 मधुमेहाचा धोका टाळण्यासाठी ओळखले जाते.
नक्की वाचा:Health Tips:वजन कमी करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आहारात 'या' फळांचा करा समावेश, होईल फायदा
2- लाल तांदूळ- मॅगनीज आणि अँटिऑक्सिडंट ने समृद्ध असलेला हा भात डायबीटीस आणि लठ्ठ रुग्णांसाठी रामबाण औषधापेक्षा कमी नाही.
काही अभ्यासकांनी असे सूचित केले आहे की, लाल तांदळाचे नियमित सेवन दम्याचा त्रास असलेल्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
कारण ते ऑक्सिजन परिसंचरण सुधारते. लाल भात खाल्ल्याने तुमची भूक बराच काळ दूर राहते ज्यामुळे तुमचे वजन कमी होते.
3- काळा तांदूळ- ब्लॅक राईस अर्थात काळा तांदूळ ही भारतातील लोकप्रिय तांदळाची जात नसली तरी हा ट्रेंड हळूहळू जोर धरू लागला आहे.
त्याला जंगली तांदूळ असे देखील म्हणतात. पॉलिश न करता ते बाजारात पाठविले जाते. काळा तांदूळ हे फोलेट,झिंक, फॉस्फरस, नियासिन आणि विटामिन बी 6 त्यांचे भांडार आहे.
एक नैसर्गिक डीटोक्सिफायर आहे. जे फायबर ने भरलेले आहे आणि मधुमेह आणि लठ्ठपणा चा धोका देखील प्रतिबंधित करते.
4- बांबू तांदूळ-बांबू तांदूळ हा एक दुर्मिळ भात प्रकार आहे. हे मुख्यतः डोंगराळ भागात आदिवासी समुदाय पिकवतात आणि चांगले आरोग्य सुधारण्यासाठी हा त्यांचा आहारातील मुख्य घटक आहे.
हा तांदूळ सांधेदुखीचा त्रास असलेल्या लोकांसाठी चमत्कारीक औषध म्हणून काम करतो.
( टीप- वरील माहिती सामान्य माहितीवर आधारित असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. त्याच्याशी व्यक्तिगत आणि कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही. कुठलाही आहारामधील बदल किंवा वैद्यकीय उपचारांसाठी डॉक्टरचा सल्ला घ्यावा.)
नक्की वाचा:रात्री 'हे'लक्षण दिसत असेल तर आतापासून व्हा सावध,असू शकतो डायबिटीस
Share your comments