केसांमधील कोंडा ही समस्या बहुतेक जणांना असते. कारण आपले केस म्हणजे आपला एक सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो. प्रत्येकालाच वाटत असते की आपले केस मुलायम आणि निरोगी असावेत.
परंतु केसामध्ये देखील बरेच प्रकारच्या समस्या उद्भवतात. जसे की केस गळणे ही एक समस्या आहेच. परंतु केसांमध्ये कोंडा होणे ही समस्या फारच जास्त प्रमाणात आढळते. यामागे तशी कारणे देखील बरीच असतात. जसे की धूळ, हवेचे प्रदूषण तसेच तीव्र तापमान यासारख्या घटकांमुळे देखील ही समस्या निर्माण होऊ शकते. या लेखामध्ये आपण केसातील कोंडा घालवण्यासाठी काही घरगुती उपाय जाणून घेऊ.
नक्की वाचा:पुढील दोन दिवसात राज्यात पडणार मुसळधार पाऊस, हवामान खात्याचा या जिल्ह्यांना अलर्ट
केसातील कोंडा कमी करण्यासाठी हे उपाय ठरतील फायदेशीर
1- तेल मालिश- जर केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तेलाने केसाची मालिश करणे फायद्याचे ठरते. जर कोमट तेलानेडोक्याची मालिश केली तर डोक्याचे स्नायू उत्तेजित होतात आणि रक्ताभिसरण वाढते. यामुळे केस निरोगी, दाट आणि कोंड्यापासून मुक्त होतात. म्हणून आठवड्यातून किमान एकदा तरी तेलाने मालिश करावे. यामध्ये एक चमचा लिंबाचा रस हा पाच चमचे नारळाच्या तेलात टाकून केसांना हळुवार मालिश केली तर कोंडा गायब होतो.
2- लिंबाचा रस- लिंबू मध्ये विटामिन सी, बी, ए आणि फास परत तसेच अँटिऑक्सिडंट असतात. केसांमध्ये कोंडा झाला असेल तर कोमट तेलामध्ये लिंबाचा रस मिसळावा आणि केसांना मालीश करावे त्यामुळे केस गळणे थांबते तसेच लिंबाचा रस हा पाण्यामध्ये मिसळून केस धुतले तर किंवा लिंबू हळुवारपणे केसांना घासू शकता.
3- मेथीच्या दाण्याचे उपयोग- मेथीच्या दाण्यांमध्ये निकोटिनिक ऍसिड आणि प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. याचा फायदा हा केसांच्या मुळाना पोषण मिळण्यासाठी होतो. रात्रभर दोन चमचे मेथीचे दाणे पाण्यात भिजवावे आणि सकाळी बारीक करून त्याची पेस्ट बनवावी. ती पेस्ट केसांना लावावी आणि तीस मिनिटे तसेच राहू द्यावे नंतर केस धुवावेत. केसातील कोंडा गायब करण्यासाठी हा उपाय खूपच परिणामकारक आहे.
4- दही- एक चमचा दही घेऊन जर केसांना लावले आणि एक तास ठेवले आणि मग केस धुवावेत. कोंडा गायब होतो.
5- कोरफड-कोरफडीचा गर लावावा. एलोवेरा जेल किंवा कोरफडच्या गराने डोक्याची मालिश केल्याने केसांची आणि डोक्याच्या त्वचेच्या आणि समस्या दूर होतात.
नक्की वाचा:शेतीच व्यवस्थापन निसर्गाच्या हातात; निसर्गाच्या टाइमिंग नुसारच चला नाहीतर होईल नुकसान
6- कडू लिंबाचे पाने- डोक्याच्या कातडीला पाणी न लावता कडुलिंबाची पाने चोळावीत आणि थोड्यावेळाने डोके धुऊन टाकावे. फरक पडतो.
7- डाळीचे पीठ - दही आणि हरभरा डाळीचे पीठ एकमेकांमध्ये मिसळावे आणि हलक्या हाताने डोक्याच्या त्वचेवर मालिश करा. यामुळे केसातील कोंडा कमी होतो.
8- तुळस- केसांमध्ये कोंडा झाला असेल तर तुळस आणि आवळा पावडर एकत्र करून अर्धा तास डोक्याच्या त्वचेवर लावावे आणि नंतर एखाद्या हरबल शाम्पूने केस धुवावेत.
( टीप- कुठलेही वैद्यकीय उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा)
Share your comments