उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उन्हामुळे आपल्या शरीरात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिटॅमिन ची कमतरता भासत असते त्यामधील एक म्हणजे व्हिटॅमिन सी हे आहे. व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप आवश्यक आणि फायदेशीर समजले जाते. प्रामुख्याने व्हिटॅमिन सी म्हटलं की आपल्या समोर पहिले येते ते म्हणजे लिंबू, संत्री, मोसंबी या प्रकारची फळे. परंतु या फळांच्या व्यतिरिक्त सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन सी योग्य प्रकारे मिळू शकते.
आपल्या शरीराला खूप फायदेशीर:
आहारामध्ये आपण सुक्या मेव्याचा वापर करत असतो यामध्ये काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड यांचे सेवन करत असतो. यामध्ये बहुतांशी लोकांना काजू आवडतात. काजू आपल्या शरीराला खूप हेल्दी आणि फायदेशीर ठरतात. त्याबरोबरच काजू फळ खाणे सुद्धा आपल्या शरीराला खूप फायदेशीर असते.काजू फळांना काजू सफरचंद असे सुद्धा म्हटले जाते. या फळापासून आपल्या शरीराला अनेक पोषक घटक मिळतात.त्यात झिंक, लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, ल्युटीन, मॅग्नेशियम, आहारातील चरबी, फॉस्फरस, फायबर, कार्बोहायड्रेट्स इत्यादी अँटीऑक्सिडंट्स यांसारखि अनेक पोषक द्रव्ये असतात.
काजू फळ खाण्याचे फायदे:-
काजू फळ हे आपल्या शरीराला अत्यंत पोषक आणि फायदेशीर आहे त्यापासून आपल्याला अनेक पोषक द्रव्ये मिळत असतात. काजू फळ खाल्ल्यामुळे शरीरास अनेक फायदे होतात त्यामधील हृदयाचे कार्य सुधारते. शरीरातील रक्त प्रवाह सुधारतो,त्वचा निरोगी आणि तरुण बनवते,केस मजबूत, चमकदार बनवते,हाडांना बळ देते,दात आणि हिरड्या निरोगी ठेवतात,पचन सुधारते,डोकेदुखी कमी होते,डोळे निरोगी राहतात,मधुमेह नियंत्रित करते,मेंदूचे कार्य सुधारते,कर्करोगाचा धोका कमी करते.या प्रकारच्या आजारांपासून आणि रोगांपासून आपला बचाव होण्यास मदत होते.
तसेच काजू फळामध्ये संत्रापेक्षा पाच पटीने जास्त व्हिटॅमिन सी चे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच या मध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म पोटातील अल्सर, गॅस्ट्रिक समस्या दूर करतात.आणि आपले रक्षण करतात. यासाठी काजूफळ हे एक आरोग्यासाठी लाभलेले एक वरदान आहे. याचबरोबर संत्री, लिंबू, मोसंबी यांपासून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन सी मिळते परंतु याच्या बदल्यात काजू फळ हे जास्त परिणामकारक आहे.
Share your comments