सध्या अनेक खाद्य पदार्थांमध्ये भेसळ एक मोठा ज्वलंत प्रश्न आहे. आता काही दिवसांपूर्वीच आपण बातम्या वाचल्या असतील कि पनीरमध्ये सुद्धा भेसळ केल्याचे आढळून आले. या भेसळीचे परिणाम आपल्या आरोग्यावर खूप विपरीत पद्धतीने होतो. असाच एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे दुधातील भेसळ हा होय. दूध हे आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे असून उत्तम आरोग्यासाठी लोक दुधाचे सेवन करतात.
परंतु सध्या दुधातील भेसळ ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. कारण दुधातील भेसळ ही शरीरासाठी धोकादायक असल्यामुळे दुधात कोणत्या गोष्टीची भेसळ केली जाऊ शकते व ती कशी ओळखावी हे माहीत असणे तेवढेच गरजेचे आहे. या लेखात आपण त्याबद्दल माहिती घेऊ.
नक्की वाचा:Health Tips: अचानक कान दुखू लागल्यास करा 'हे'घरगुती उपाय,मिळू शकतो आराम
कृत्रिम दुधाची ओळख
दुधातील भेसळ वासाने देखील शोधले जाऊ शकते. जर दुधाला साबणाचा वास येत असेल तर हे दूध कृत्रिम आहे, असे समजावे कारण अस्सल दुधाला असला वास येत नाही.
तसेच एका वाडग्यात दुधाचे काही थेंब टाकावे आणि त्यात हळद मीक्स करा. असं केल्यानंतर जर हळद लगेच घट्ट होत नसेल तर याचा अर्थ असा होतो की दुधात भेसळ झाली आहे.
दुधामध्ये डिटर्जंट भेसळ
दुधातील भेसळ ओळखण्यासाठी सर्वप्रथम थोडे दूध आणि पाणी समान प्रमाणात घ्या. त्याला नीट ढवळून हलवा असे केल्याने दुधाला फेस येईल. दुधाला थोड्या प्रमाणात फेस येणे सामान्य आहे
परंतु जास्त आणि साबणासारखा जास्त फेस आला तर समजून घ्या की दुधामध्ये डिटर्जंटची भेसळ आहे.याव्यतिरिक्त,तळ हातावर थोडे दूध चोळावे. असे केल्याने जर दुधात डिटर्जंट भेसळ असेल तर तुम्हाला तुमच्या हातावर स्निग्धपणा येईल.
नक्की वाचा:Health Tips: टिप्स आहेत एकदम छोट्या, परंतु गॅस आणि ऍसिडिटी दूर करण्यास हमखास आहेत उपयोगी
दुधात पाण्याची भेसळ
आपल्याला माहित आहेच कि दुधामध्ये पाणी बऱ्याच प्रमाणात विसरले जाते. दुधात पाण्याची भेसळ आहे की नाही हे तपासण्यासाठी सर्वप्रथमएखाद्या गुळगुळीत लाकडी किंवा दगडाच्या पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाकावा.
शुद्ध दुधाचा एक थेंब हळू हळू पांढरा रंग सोडून वाहून जाईल परंतु पाण्याची भेसळ असलेल्या दुधाचा एक थेंब कोणताही रंग किंवा डाग न सोडता वाहून जातो.
दुधात युरियाचा वापर
युरियाचा वापर दूध घट्ट करण्यासाठी केला जातो. दुधात युरियाची भेसळ आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही टेस्ट ट्युबमध्ये एक चमचा दूध घाला.
त्यामध्ये अर्धा चमचा सोयाबीन किंवा तूर पावडर घालून चांगले मिक्स करा. थोड्या वेळा नंतर त्यात लाल लिटमस पेपर टाका. अर्ध्या मिनिटानंतर हा लाल रंग निळा झाला तर दुधात युरिया मिसळला आहे असे समजा.
Share your comments