उन्हाळा म्हटलं की, अंगाची लाही लाही करणार होऊन, प्रमाणात येणारा थकवा, शरीरातील कमी होणारी पाण्याची पातळी इत्यादी अनेक समस्यांमुळे उन्हाळा हा नको नकोसा वाटतो. उन्हाळ्यामध्ये प्रमुख्याने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्याने बहुतेकदा सन स्ट्रोक अपाय होऊ शकतो.
त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आहाराकडे व्यवस्थितपणे लक्ष देणे गरजेचे असते. विविध प्रकारच्या फळांचे सेवन करणे हे आरोग्याच्या दृष्टीने फारच हितकारक असते. उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी कोणते फळे खाणे लाभदायक आहे याविषयी माहिती जाणून घेऊया.
खरबूज
उन्हाळ्यात जर तुम्ही खरबुजाचे सेवन केले तर तुम्हाला तुमचे शरीर थंड ठेवण्यासाठी मदत होते. उन्हाळ्यात शरीराला थंड ठेवण्यासाठी भरपूर प्रमाणात पाण्याची गरज असते. ही गरज खरबूज या फळांमध्ये पूर्ण होत असते. खरबुजा मध्ये भरपूर प्रमाणातअँटिऑक्सिडंट असतात. तसेच बहुतेक प्रमाणात विटामिन सुद्धा असतात. खरबुजाचे सेवन केल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी होऊन शीतलता निर्माण होते.
कलिंगड
उन्हाळ्यात शक्यतो जास्तीत जास्त कलिंगडाचे सेवन करणे फायदेशीर असते. कलिंगडामध्ये एंटीऑक्सीडेंट, विटामिन बी आणि सी तसेच डी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. कलिंगडाचे सेवन केल्याने शरीरालाआवश्यक ऊर्जा तत्काल उपलब्ध होत असते. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती उत्तम ठेवण्यासाठी कलिंगड खाणे फायद्याचे आहे.
संत्रा
संत्रा मध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये संत्र्याचे सेवन आवश्यक केले पाहिजे. संत्री हे कमी कॅलरीज आणि फायबर युक्त फळ असल्याने वजन कमी करण्यासाठी हे लाभदायक आहे.
पपई
पपई हे सहजासहजी उपलब्ध होणारे फळ असून पपई मध्ये असलेल्या विटामिन ए आणि सी, बुलेट सारखे पोषक घटक असल्याने शरीराला ते फायदेशीर असते. उन्हामुळे त्वचा ही काळ सर होते. अशा त्वचेवर पपईचा गर लावल्याने हो तो घर दहा ते पंधरा मिनिटे चेहऱ्यावर तसाच ठेवावा व नंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन टाकावा. असं केल्याने चेहरा ताजातवाना दिसू लागतो.
पेरू
उन्हाळ्यामध्ये सहजासहजी भूक मंदावते. भूक व्यवस्थित लागत नाही. सर तुम्ही नेहमी पाणी उन्हाळ्यात पेरूचे सेवन केले तर तुम्हाला व्यवस्थित भूक लागते. तसेच पिल्लू आम्लपित्त या विकारावर गुणकारी आहे. पेरू मध्ये विटामिन सी असल्याने पेरू चे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते.
द्राक्ष
उन्हाळ्यात आपल्या आहारात द्राक्षांचा समावेश अवश्य करावा. कारण रक्षक खाल्ल्याने लघवीच्या वेळी होणाऱ्या वेदना आणि होणारी जळजळ बऱ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होते. द्राक्ष खाल्ल्याने डोकेदुखी कमी होण्यास मदत मिळते आणि मन शांत राहते.
अननस
उन्हाळ्यात अननसाचा आहारात समावेश करणे फार उपयुक्त आहेत. अननसाचे सेवन केल्याने पचनसंस्था सुधारण्यास सहाय्य मिळते. अननसाचा मध्ये विटामिन सी आणि फायबर असल्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते.
संदर्भ- इन्फो मराठी
Share your comments