भारतीय स्वयंपाक घरात (In the Indian kitchen) हळदीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे हळद विना कुठलाही भारतीय विशेषता महाराष्ट्रीयन पदार्थ बनवणे जवळपास अशक्यच. हळदीमुळे फक्त पदार्थांची चव वाढते असे नव्हे तर याच्या आयुर्वेदिक गुणधर्मांमुळे हळद मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आयुर्वेदामध्ये हळदीला वेदनाशामक म्हणून ओळखले जाते. प्राचीन काळापासून हळदीचा उपयोग अनेक रोगांपासून निदान मिळवण्यासाठी केला जात आहे. मात्र, असे असले तरी हळद ही काही लोकांसाठी अपायकारक देखील ठरू शकते. त्यामुळे आज आपण हळदीचे सेवन कोणत्या व्यक्तींनी करू नये (Which person should not consume turmeric?) याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया हळदीचे साईड इफेक्ट.
डायबिटीज असलेल्या व्यक्तींनी (People with diabetes)
जे व्यक्ती डायबिटीज या आजाराने ग्रस्त असतील, आणि त्यांचा उपचार चालू असेल त्या व्यक्तीनीं चुकूनही हळदीचे सेवन करू नये. डायबिटीज चा उपचार घेत असलेल्या व्यक्तींना रक्त पातळ करण्याची टॅबलेट दिली जाते तसेच साखर नियंत्रित करण्यासाठी औषध दिले जातात आणि म्हणून अशा लोकांनी हळदीचे सेवन करू नये कारण की यामुळे अशा व्यक्तीच्या शरीरातील रक्ताचे प्रमाणकमी होऊ शकते. आणि त्यांना गंभीर समस्येला तोंड द्यावे लागू शकते.
सांधेदुखी तसेच काविळ असलेल्या लोकांनी (People with joint pain and jaundice)
ज्या व्यक्तींना सांधेदुखीचा त्रास आहे त्यांनी हळदीचे सेवन टाळावे तसेच ज्या व्यक्तींना काविळ असेलत्या व्यक्तीने देखील हळदीचे सेवन टाळावे. जोपर्यंत कावीळ पूर्णतः बरा होत नाही तोपर्यंत हळदीचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. तसेच सांधेदुखी तसेच काविळ बरी झाल्यानंतर देखील आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानेच हळदीचे सेवन करावे नाहीतर आपणास परत या समस्यांना तोंड द्यावे लागू शकते.
मुतखडा असलेल्या व्यक्तीने (By a person with kidney stones)
ज्या व्यक्तींना मुतखड्याची समस्या असते त्या व्यक्तीने देखील हळदीचे सेवन करू नये असे सांगितले जाते. अनेक लोकांना अधून-मधून मुतखड्याचा त्रास जाणवत असतो, अशा लोकांनी हळद पूर्णतः खाणे टाळावे.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Share your comments