आजच्या घडीला निरोगी शरीर आणि आरोग्य हे खूप महत्वूर्ण आहे. या बदलत्या काळाबरोबर लोकांना अनेक वेगवेगळ्या आजारांची लागण होताना आपल्याला दिसत आहे. एवढंच नाही तर याला कारणीभूत सुद्धा मनुष्य च आहे. पौष्टिक आहार आणि व्यायाम नसल्यामुळे सर्वात जास्त आजार होतात. तर या लेखात आपणास मुळव्याधावरील काही आयुर्वेदिक उपचार सांगणार आहोत.
1) दूध:-
जर मूळव्याध हे सुरुवातीच्या टप्प्यात असेल तर मूळव्याध यावर दूध खूप फायदेशिर ठरते. या करीता दररोज रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास कोमट दुधात 1 चमचे गाईचे तूप मिसळून प्यावे . यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येवर आराम मिळतो आणि त्यामुळे मूळव्याधीची समस्याही कमी होण्यास मदत होते.
2) सफरचंद:-
या फळामध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात शिवाय शिवाय सफरचंदातील अघुलनशील तंतू पचनामध्ये तुटत नाहीत आणि मल मोकळा करण्यास, आतड्याची हालचाल सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे मूळव्याध चा त्रास कमी होतो म्हणून दररोज सकाळी एक सफरचंद खावा त्यामुळे आरोग्य सुधारण्यास सुद्धा मदत होते.
हेही वाचा:-यूट्यूब वर शिकून केली ड्रॅगन फळ लागवड, पहिल्याच वर्षी या शेतकऱ्याने घेतले लाखाचे उत्पादन
3) देशी गाई चे तूप:-
अनेक आजारांवर उपयुक्त असे हे देशी गाई चे तूप, दररोज आहारात देशी गाईच्या तुपाचा वापर केल्यास पचनासंबंधित असलेले आजार नाहीसे होतात तसेच सकाळी गरम पाण्यातून एक चमचा घेतल्याने मूळव्याधाचा त्रास कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा:-धोकादायक घोणस अळीपासून स्वत:ला आणि पिकाला कसे वाचवावे, वाचा सविस्तर
4) काळा मनुके:-
काळया मनुक्यांमध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. जर का आपल्या शरीरात फायबर चे प्रमाण कमी असेल तरच आपल्याला मूळव्याध चा त्रास होत असतो म्हणून मूळव्याध असणाऱ्या व्यक्तींनी फायबर युक्त पदार्थाचे सेवन करावे.
5)नाशपाती :-
नाशपाती आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. नाशपती मद्ये मुबलक प्रमाणत फायबर आणि इतर संयुगे असतात. ज्यामुळे मूळव्याधची लक्षणे कमी होण्यास मदत होते. हे फळ त्वचेसाठीही आरोग्यदायी आहे. त्यात फ्रक्टोज देखील आहे, जे एक नैसर्गिक रेचक आहे.
Share your comments