शरीराच्या उत्तम आरोग्यासाठी आठ तासांची झोप आवश्यक आहे. जे लोक दिवसातून सात ते आठ तास झोपतात ते जास्त काळ जगतात असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांगली झोप तुमच्या शरीरातील पेशींना ताजेतवाने करते आणि तुमच्या मेंदूला चालना देते. पण काही लोकांना कितीही प्रयत्न केले तरी चांगली झोप येत नाही.
झोपेच्या कमतरतेमुळे आळशीपणा, चिडचिड आणि मूड बदलू शकतो. त्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचा धोका असतो. तणाव वाढल्याने झोपेवर परिणाम होतो. दीर्घकाळापर्यंत प्रदर्शनामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार, हार्मोनल असंतुलन होऊ शकते. तज्ञांच्या मते, काही सोप्या उपायांमुळे तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
संध्याकाळी झोपी जाण्याआधी किमान तीन तास काही खाऊ नका आणि चहा-कॉफीसारखे उत्तेजक पेय घेऊ नका.
झोपेच्या एक तास अगोदर मोबाईल, कॉम्प्युटर किंवा टीव्ही बघणे बंद करा.
आहारामध्ये मॅग्नेशियम असलेल्या पदार्थांचा समावेश करा.
नियमित व्यायामाने झोप सुधारता येते, म्हणून व्यायाम करा.
दुपारी जास्त झोपत असाल तर झोपणे बंद करा.
रात्री झोपताना गरम गरम हळदीचे दूध पिल्याने गाढ झोप लागते.
मानसिक त्रास असेल तर, मनोसोपचार तज्ञांची मदत घेऊन बाहेर पडा.
झोपण्याची वेळ निश्चित करा, रात्री दहा वाजता झोपण्याचा प्रयत्न करा.
झोपताना डोक्या मधून वाईट आणि चिंताजनक विचार काढून टाका.
थोडी खिडकी उघडी ठेवा जेणेकरून बाहेरील हवा आता येईल व तुम्हाला उत्साही वाटेल.
शांतता, अंधार, आरामदायक अंथरूण-पांघरूण असावे.
निद्रेआधी शरीराला तणावरहीत करा.
आवडते पुस्तक वाचन, दीर्घ श्वास, ध्यानधारणा त्यासाठी उपयोगी ठरते.
काहींच्या बाबतीत गरम पाण्याने स्नान गाढ झोपेसाठी उपयुक्त ठरते.
झोपेआधी सौम्य व्यायामही उपयोगी ठरतो. त्यामुळे शरीरातील तणाव कमी होतो.
तसेच चिंतेचे प्रमाण सौम्य होते. स्नायू शिथील झाल्याने गाढ झोप लागते.
महत्वाच्या बातम्या
सावधान ! देशात अजून कोरोना सक्रिय; एका दिवसात घावले तब्बल 'इतके' रुग्ण
Share your comments