1. आरोग्य सल्ला

ग्रेट! दही भात खाल्ल्याने 'हे' होतात आश्चर्यकारक फायदे, याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल थक्क

आपल्याकडे कुठलेही शुभ कार्य करण्याअगोदर दही खाऊ घालण्याची एक रीत आहे, पण कदाचित आपणास दही खाण्याने आरोग्याला होणारे आश्चर्यकारक फायदे ठाऊक नसणार. दही खाण्यास खूपच चविष्ट असते, शिवाय यामध्ये असलेले पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी कारगर सिद्ध होतात. दही आणि भात एकत्रितरीत्या सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे होतात. असे असले तरी, सणासुदीचे दिवस व उपवास वगळता आपण कदाचितच दही चे सेवन करतो. पण दह्याचे सेवन हे निदान आठवड्यातून तीन-चार दिवस तरी करणे अत्यावश्यक आहे. अनेक आहार तज्ञ व डॉक्टर्स दह्याचे सेवन करण्याचा सल्ला देतात.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
yogurt

असे सांगितले जाते की, जेवणानंतर दह्याचे सेवन केल्याने अनेक रोगांपासून दूर राहता येऊ शकते. दह्यात एंटीऑक्सीडेंट, प्रोबायोटिक्स आणि फॅट हे मुबलक प्रमाणात आढळतात, हे पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी खूपच गरजेचे असतात. दह्याचे सेवन केल्याने पोटा संबंधित असलेले अनेक विकार दूर होतात, तसेच याचे नियमित सेवन केल्याने मानसिक संतुलन देखील सुधारते. दह्याचे सेवन केल्याने वजन नियंत्रित राहते. जर आपणास स्ट्रेस तसेच थकवा जाणवत असेल किंवा आपणास मळमळ होत असेल तर अशावेळी दही खाणे उत्तम राहते आणि यामुळे या समस्येपासून आराम मिळतो. भात देखील आपल्या शरीराला अनेक पोषक घटक पुरवीत असतो. म्हणून आज आपण दहीभात एकत्रितरित्या खाल्ल्याने होणारे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणुन घेऊया याविषयी सविस्तर.

दहिभात खाण्याचे फायदे

  • लठ्ठपणा असेल तर करा दहिभाताचे सेवन

जर आपले वजन आवश्यकतेपेक्षा जास्त असेल किंवा आपण लठ्ठपणाचे शिकार असाल. तर आपण दही भात खाल्ला पाहिजे, यामुळे आपल्या शरीरातील कॅलरीज कमी होतात आणि आपल्या शरीराचे वजन कमी होण्यास मदत होते.

  • ताप कमी करण्यास उपयोगी

दहीभात आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढवण्यास उपयोगी ठरते. ताप आल्यावर जेवण जात नाही तसेच अन्न कडू लागते, त्यामुळे अशा वेळी दही भाताचे सेवन फायदेशीर ठरू शकते.

दहीभात मध्ये असलेले पोषकतत्वे आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करतात, त्यामुळे ताप आल्यावर जे मरगळल्यासारखे होते किंवा अशक्तपणा येतो तो कमी होईल.

  • जुलाब झाल्यास

अनेकदा अन्नाचे पचन व्यवस्थित न झाल्यास आपले पोट बिघडते व जुलाबाचा त्रास होतो, अशा परिस्थितीत इतर अन्नपदार्थ खाणे कठीण होऊन बसते, त्यामुळे अशावेळी  दहिभात खावे. यामुळे अन्न व्यवस्थित पचते, म्हणून दहिभात सेवन अनेक समस्यावर रामबाण इलाज असल्याचे सांगितले जाते.

English Summary: there are amazing benifits to eating curd rice Published on: 22 December 2021, 06:37 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters