मित्रांनो लिंबूचे सेवन केल्याने आपल्या आरोग्यास अनेक फायदे मिळतात. लिंबू मध्ये विटामिन सी हे भरपूर प्रमाणात आढळते, तसेच इतरही पोषकतत्वे लिंबू मध्ये भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे आहार तज्ञ, डॉक्टर लिंबूचे सेवन करण्याचा सल्ला देतात. असे सांगितले जाते की लिंबूचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. मित्रांनो रोज केवळ एक लिंबू खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात, आज आपण लिंबूचे सेवन केल्याने आपल्या शरीरास कुठले फायदे मिळतात याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
लिंबू मध्ये विटामिन सी, फायबर, यासारखे पोषक तत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. लिंबू फक्त वजनच कमी करण्यास मदत करते असे नाही तर नींबू चे सेवन केल्याने ऍनिमिया, हार्ट डिसीज यासारखे अनेक भयंकर आजारांपासून सुद्धा दूर राहता येऊ शकते. लिंबूचे सेवन किडनी स्टोन, पोटांचे विविध विकार यापासून आपणास सुरक्षा प्रदान करते. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया एक लिंबू नियमित सेवन केल्याने त्यापासून होणारे फायदे तपशीलवार.
लिंबूचे नियमित सेवन केल्याने होणारे फायदे
- फॅट कमी करण्यास मदत करते:- आपल्या शरीरातील चरबी अर्थात फॅट कमी करण्यासाठी लिंबूचे सेवन करणे फायदेशीर ठरते. लिंबूचे सेवन आपले लिव्हर तंदुरुस्त ठेवण्यास मदत करते. सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून पिल्याने नैसर्गिकरित्या विषारी पदार्थ बाहेर पडतात. लिंबू सेवन केल्याने पाचन तंत्र आणि यकृतातील नसा उत्तेजित होतात ज्यामुळे पचन आणि आतड्यांच्या हालचालींना प्रोत्साहन मिळते.
- मुतखडा असल्यास करावे लिंबूचे सेवन:- जर आपणही मुतखड्यामुळे अर्थात किडनी स्टोन मुळे परेशान असाल तर, आपण अवश्य आपल्या आहारात लिंबू चा समावेश करा, यामुळे आपणास किडनी स्टोन पासून कायमची मुक्ती मिळेल. लिंबूचे नियमित सेवन केल्याने आपली किडनी तंदुरुस्त राहते. लिंबू मध्ये सायट्रेटचे प्रमाण खूप अधिक असते आणि साइट्रेट किडनी स्टोन बनू देत नाही, म्हणून लिंबूचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरते.
- लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी अधिक प्रमाणात असते. याला व्हिटॅमिन सी चे भांडार म्हणुन ओळखले जाते. त्यामुळे जर आपणास व्हिटॅमिन सीची कमतरता असेल तर रोज एक लिंबू सेवन केल्याने तुमच्या शरीरात व्हिटॅमिन-सीची कमतरता होत नाही, तसेच तुम्हाला हृदयविकाराचा झटका, त्वचेशी संबंधित समस्यांचा धोकाही कमी होतो. म्हणून नियमित लिंबू सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
Share your comments