आपल्या रोजच्या आहारात आणि जेवणात मसाल्यांचा उपयोग नियमित होत असतो. मसाल्यांमुळे आपल्या जेवणाला चव येते आणि जेवण रुचकर लागते.
रोजच्या आहारात अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या मसाल्यांचा समावेश होतो. त्यामध्ये लवंग, दालचिनी, पत्ता, आणि मिरी या अनेक मसाल्याचा उपयोग होतो.
आपल्या आहारात रोज अनेक मसाल्यांचा वापर होतो परंतु तुम्हाला माहितेय का? हे दैनंदिन वापरात असलेले मसाल्याचे पदार्थ खाल्याने आपल्या शरीराला खूप फायदा होत असतो. मसाल्याचे पदार्थ खाल्यामुळे आपल्या शरीराला गर्मी मिळते.
रोज काळी मिरी खाण्याचे आरोग्यदायी फायदे:-
- जर का आपल्याला गॅस ची समस्या असेल तर काळी मिरी यावर जालीम उपाय आहे. जर का गॅस संबंधित त्रास झाला तर मिरी चे सेवन करावे. काळी मिरी लिंबाच्या रसात टाकावी आणि काळे मिट टाकून दिवसातून 2 वेळा सेवन केल्याने गॅस संबंधित त्रास दूर होतो.
- जर का आपल्याला कफ किंवा खोकला येत असेल तर कमीत कमी 4 दिवस काळी मिरीचे सेवन करावे त्यामुळं पूर्णपणे खोकला नाहीसा होतो.
- जेवण झाल्यानंतर आपल्याला अपचन गॅस संबंधित त्रास जाणवल्यास जेवणानंतर मिरी पूड मध्ये लिंबाचा रस आणि सैंधव मीठ टाकून ते मिश्रण चोखावे.
हेही वाचा :ठणठणीत आरोग्यासाठी उपयुक्त आहे उसाचा रस
- जर का आपल्या फुफ्फुसात आणि श्वसन नलिकांमध्ये संसर्ग झाल्यावर आपण काळीमिरी आणि पुदीना मिश्रित चहा बनवून पिल्यामुळे आपल्याला आराम मिळतो.
- जर का आपला घसा बसला असेल, तर तूप, साखर आणि मिरी पावडर यांचे मिश्रण बनवून चाटल्याने सर्व ठीक होते.
- आपल्या जेवणाची चव वाढवण्याचे काम तर मिरी करतेच पण त्यासोबत जर तुम्हाला भूक वाढवायची असेल तरी सुद्धा काळी मिरी खुपच आवश्यक आहे. जसे की तुम्हाला भूक कमी आहे आणि वाढवायची असेल तर काळी मिरी आणि गुळ यांचे मिश्रण करा आणि दिवसातून एक वेळी खावा त्यामुळे तुमची भूक वाढेल.
- तुम्हाला जर ताणतणावापासून व डिप्रेशन पासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही नक्की काळी मिरी सेवणात घेतली पाहिजे, कारण काळ्या मिरीमध्ये पिपेरिनमध्ये अँटी ऑक्सिडंट असतात त्यामुळे तुम्ही यापासून सुटका होते.
- तुम्हाला एखाद्या प्रकारची जखम झाली असेल आणि त्यातून रक्ताचा स्त्राव थांबत नसेल त्यावर काळी मिरी कुटून लावावी यामुळे तुमची जखम लवकर भरून निघेल.
Share your comments