हिवाळ्यामध्ये आपल्या आहारामध्ये बरेच बदल होतात.त्यामुळे आपल्या शरीरावर वाईट परिणाम होऊ शकतो. आहारातील बदलांमुळे आपलं वजन वाढुशकते.हिवाळ्यात आपल्या शरीरात अनेक बदल होतात.त्यामुळे या दिवसांमध्ये आपल्या आरोग्य टिकवून फार गरजेचे असते
त्यासाठी योग्य पोषक आहाराची आवश्यकता असते. हिवाळ्यात शरीराचे तापमान टिकवून ठेवण्यासाठी शरीर जास्त प्रमाणात ऊर्जेचा वापर करते.त्यामुळेवारंवार भूक लागते. भूक लागल्याने आपण गरजेपेक्षा जास्त खातो.त्यामुळे हिवाळ्यात आहाराकडे विशेष लक्ष द्यायला पाहिजे.या लेखात आपणहिवाळ्यात फायदेशीर अशा आहाराचीमाहिती घेऊ.
हिवाळ्यातील आहार
- हिवाळ्याच्या दिवसात मिळणारे लाल गाजर, नवलकोल अशा भाज्या पौष्टिक तर असतातच पण त्यामुळे थंडीपासून रक्षण होतं.यात प्रामुख्याने होणाऱ्या खोकला, सर्दी आणि फ्लूसारख्या आजारांना या भाज्यांच्या सेवनाने दूर ठेवता येते.
- हिवाळ्यात ग्रीन टी घेणे फायद्याचे ठरते. ग्रीन टी मध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात.त्यामुळे हिवाळ्यातील अनेक बॅक्टेरियाचा प्रभाव कमी होतो व रोगप्रतिकारक शक्ती वाढायला मदत होते.
- हिवाळ्यात जर लसुन खाल्ला तर फार चांगले असते.लसुन खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते व रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- दूध गरम करून त्यामध्ये मध टाकून प्यायल्यास शरीरात ऊर्जा निर्माण होते.थंडीत दुधात साखरऐवजी मध घालावे.
- हिवाळ्यामध्ये आहारात हिरव्या भाज्यांचा समावेश करावा कारण हिरव्या भाज्यांमध्ये असलेले अआणि क जीवनसत्वामुळे शरीराला फायदा होतो.
- हिवाळ्यामध्ये द्राक्षे आणि संत्री ही फळे जर खाल्ली तर शरीराला क जीवनसत्त्व मिळते.त्यामुळे त्वचेचे पोषण होऊन कोलेस्टेरॉल कमी करण्यासोबतच ही फळे चयापचय क्रिया हीवाढवतात.
- हिवाळ्यामध्ये प्रथिनयुक्त आहार घ्यावा.ब्रेड सारखे पदार्थ खाणे टाळावे.
- हिवाळ्यात तेलकट पदार्थ खाणे जवळजवळ टाळावे.
- हिवाळ्यामध्ये शीतपेये, फक्त जमते पदार्थ तसेच गोड पदार्थ यांचे सेवन अल्प प्रमाणात करावे.सर्दी आणि खोकला असेल तर दुग्धजन्य पदार्थ टाळावेत.( संदर्भ- वेबदुनिया )
टीप-कुठलाही औषध उपचार करण्या अगोदर डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.
Share your comments