शेळीचे दूध चवीला भलेही चांगले लागत नसेल. आणि त्याची वेगळ्या प्रकारची चव तुम्हाला आवडत नसेल. मात्र शेळीच्या दुधामध्ये प्रोटीन्स भरपूर असते. ज्या अर्भकांना आईचे दूध मिळू शकत नाही त्यांना शेळीचे दूध नक्की पाजले पाहिजे.
या दुधामध्ये गाईच्या दुधा पेक्षा खूप जास्त फायदे आणि न्यूट्रिशन गुण असतात. तर आपण आज असे शेळीच्या दुधाचे दहा फायदे जाणून घेणार आहोत. ते ऐकून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल.
- शेळीचे दुध नवजात अर्भकांच्या विकासासाठी आणि त्यांच्या आतड्यांना मजबूत करण्यासाठी खूप मदत करते.
- पचण्यासाठी चांगले असण्यासोबतच हे दूध अर्भकांच्या एमिनेम सिस्टीम ला मजबूत बनवत.
- शेळीचे दूध आतड्याची सूज कमी करण्यासाठीसुद्धा फायदेशीर आहे.
- शेळीच्या दुधामध्ये असणारे प्रोटीन अर्भकाच्या शारीरिक विकासासाठी खूप उपयोगी आहे.
- हे दूध तुमच्या पोटाच्या समस्या दूर करते आणि पचन क्रिया मजबूत करते.
- हे दुध तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते.
- याच्यामध्ये कॅल्शिअम खूप मोठ्या प्रमाणात असल्यामुळे हाडांना मजबुती मिळते.
- या दुधामध्ये कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोलमध्ये राहते आणि हृदयाचे आजार सुद्धा दूर राहतात.
- यामध्ये अस्तित्वात असलेले पोटॅशियम ब्लड प्रेशर सुद्धा नियंत्रणात ठेवते.
- डेंगू चिकनगुनिया सारख्या आजारांमध्ये प्लेटलेट्स वाढवण्यासाठी हे दुध मदत करते.
Share your comments