1. आरोग्य सल्ला

पांढरे केसांमुळे झाले आहात हैराण! मग चिंता नको,सकाळी खा 'हा' पदार्थ, लवकरच मिळेल फायदा

मित्रांनो अलीकडे या धावपळीच्या आणि बिजी लाईफ मुळे अनेक जण तणावात असतात, शिवाय वाढत्या उद्योगीकरणामुळे प्रदूषण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ह्या दोन प्रमुख कारणामुळे केस पांढरे होण्याची समस्या खुपच वाढत आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
courtesy-medical news today

courtesy-medical news today

मित्रांनो अलीकडे या धावपळीच्या आणि बिजी लाईफ मुळे अनेक जण तणावात असतात, शिवाय वाढत्या उद्योगीकरणामुळे प्रदूषण खुप मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ह्या दोन प्रमुख कारणामुळे केस पांढरे होण्याची समस्या खुपच वाढत आहे.

अनेक जण लवकर पांढरे होणाऱ्या केसांच्या समस्यामुळे हैराण झाले आहेत. जर आपणही अशाच समस्यला तोंड देत असाल तर हि बातमी आपल्यासाठी विशेष आहे. जर आपणही महागडे गोळया, औषधे इत्यादी गोष्टी करून थकला असाल आणि तरी देखील आपले पांढरे केस काळे झाले नसतील तर मग चिंता करू नका आज आम्ही आपणांस एक घरगुती आयुर्वेदिक उपचार सांगणार आहोत, ज्याद्वारे आपण आपले पांढरे होणाऱ्या केसांपासून लवकरच मुक्त व्हाल. फक्त हा घरगुती उपचार करतांना काळजी घेणे आवश्यक आहे.

 आपणही जर पांढरे होणाऱ्या केसांमुळे परेशान झाले असणार तर मग आपण गूळ आणि मेथीचे सेवन केले पाहिजे. सकाळी सकाळी गूळ आणि मेथी दोघांचे सोबतच सेवन केल्याने पांढऱ्या केसांची समस्या कायमची दुर होऊन जाईल.

पांढऱ्या केसांवर रामबाण इलाज

मित्रांनो आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमचे केस मजबूत आणि चमकदार बनवण्यासाठी गूळ आणि मेथीचे सेवन खूप फायदेशीर ठरू शकते. याचा उल्लेख आयुर्वेदिक ग्रंथात देखील पाहवयास मिळतो. आयुर्वेदानुसार पांढऱ्या केसांच्या समस्येवर हा एक रामबाण इलाज आहे आणि हा उपचार केल्याने 100 टक्के रिजल्ट मिळतो. आता सध्या थंडीची गुलाबी चाहूल संपूर्ण भारतात दिसत आहे, आणि याच हंगामात म्हणजे हिवाळ्यात केस गळण्याची समस्या खूप वाढते,

तुम्ही केस गळतीच्या समस्यासाठी देखील हा उपचार करू शकता तसेच जर तुमचे केस वेळेआधी पांढरे आणि कमकुवत होत असतील तर या उपचाराचा तुम्हाला निश्चितच फायदा होईल. मित्रांनो मात्र गुळ आणि मेथी यांचे सोबतच सेवन करावे यामुळे आपले केस मजबूत आणि चमकदार होतात.

 हे देखील करून पहा

मित्रांनो आपण 2 चमचे मेथीचे दाणे पाण्यात उकळून आणि नंतर थंड करून एक काढा तयार करा, या काढ्याने डोके धुवा आणि 10 मिनिटे केस तसेच ओले राहु द्या. यामुळे आपले केस मजबूत होतात आणि त्यांना चकाकी प्राप्त होते.

English Summary: the homemade remedy for problem of white hair problem Published on: 05 December 2021, 09:26 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters