सध्या जगाच्या काही देशांमध्ये जसे की चीन आणि दक्षिण कोरिया सह युरोप आणि आशियाच्या काही भागांमध्ये कोरोनाचा रुग्ण संख्या मध्ये खूपच वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये जो काही चीन आणि दक्षिण कोरिया मध्ये कोरोनाचा Omicron BA.2 व्हेरिएंट मुळे चौथी लाट येऊ शकते का? याबाबत आरोग्य क्षेत्रातील तज्ञांनी त्यावर काही विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला आहे.
या पार्श्वभूमीवर सरकारने महाराष्ट्र सरकारला सतर्कतेचा इशारा जारी केला असून कोविड प्रोटोकॉल चे कडक पालन करण्याचे आवाहन केले आहे. याविषयी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती देताना म्हटले की, आम्हालाकेंद्र सरकारने सतर्क राहण्याचे पत्र दिले आहे.
कारण दक्षिण कोरिया आणि चीन सारख्या देशांमध्ये कोरोना रुग्ण संख्येत प्रचंड वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने डीसीना सावध राहण्यासाठी आणि त्या संबंधी आवश्यक पावले उचलण्याचे पत्र जारी केले होते.
कोरोनाची चौथी लाट येईल का?
काही आठवड्यांनी अगोदर आयआयटी कानपूरच्या एका टीमने एक अंदाज वर्तवला होता की भारतामध्ये जून मध्ये पुढील लाट येण्याची शक्यता आहे आणि या लाटेचा पिक हा ऑगस्ट मध्ये पोहोचेल आणि पुढील चार महिने चालू राहील. याच टीमने पूर्वी भाकीत केले होते की भारतात कोरोनाची तिसरी लाट 3 फेब्रुवारी 2022 पर्यंत शिगेला पोहोचेल. पुढे त्यांनी स्पष्ट केली की पुढील व्हेरियन्ट कसा आणि केव्हा येईल यावर संपूर्ण विश्लेषण अवलंबून असेल असे देखील त्यांनी सांगितले.
नक्की वाचा:फुल शेती करायचा विचार करत आहात?तर शेवंती लागवड ठरेल फायदेशीर फुलशेती
परंतु याबाबतीत त्यांनी सांगितले की या मॉडेलचा अधिक अभ्यास करणे आवश्यक असून याबाबतीत नीती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले की, आय आय टी कानपुर चा अभ्यास हा प्रतिष्ठित लोकांद्वारे केला गेला असूनमहत्त्वाच्या माहितीच्या आधारावर आहे.परंतु या अहवालाचे काही सायंटिफिक व्हॅल्यू आहे की नाही ही तपासणी अजून बाकी आहे.
Share your comments