1. आरोग्य

फळांच्या सालींमध्ये लपला आहे बऱ्याच आजारावरील उपचार

KJ Maharashtra
KJ Maharashtra
फळांच्या सालींमध्ये  आहे उपयुक्त गुण

फळांच्या सालींमध्ये आहे उपयुक्त गुण

आपण सर्वांना माहिती आहे की, फळे खाल्याने आरोग्याला मोठा फायदा होत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का फळाच्या सालीही आपल्याला अनेक आजारांपासून वाचवू शकतात. यामुळे जर तुम्ही याच्यापुढे कधी केळी खाल तर केळीची साल फेकू नका.  केळीसोबतच आपण संत्री आणि मोसंबीची साल फेकून देत असतो, पण हे चुकीचे आहे.

कारण जपान आणि इतर देशांमध्ये झालेल्या विविध प्रकारच्या शोधामध्ये आढळून आले आहे की, फळांच्या सालींमध्ये डिप्रेशन आणि इतर आजारापासून वाचविण्याचे गुण असतात. आपल्या त्वचेला मुलायम, दागरहित आणि चमकदार बनवण्यासाठी सालींची महत्वाची भूमिका आहे.

  केळी- डिप्रेशन, मोतीबिंदू

 ताइवान येथील चूंग शान मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या संशोधनात आढळून आले आहे की, केळीच्या सालीमध्ये फीलगुड हार्मोन सेरोटोनिन मुबलक प्रमाणात उपलब्ध असते. त्यामुळे नैराश्य, उदासी इत्यादीपासून मुक्ती मिळते. तसा केळीच्या सालीमध्ये लुटीन नावाचे अँटिऑक्सिडंट सुद्धा सापडते. हे अँन्टिऑक्सिडंट डोळ्यांमध्ये असलेल्या कोशिकांचे अल्ट्रा व्हायोलेट किरणांपासून बचाव करून मोतीबिंदूपासून सुरक्षा करते.

 केळीच्या सालीचा वापर कसा करावा?

 केळीच्या सालीला दहा मिनिटे स्वच्छ पाण्यात उकळून ते पाणी थंड झाल्यानंतर पाणी गाळून प्यावे.

 पोट आणि यकृतासंबंधी रोग

 ब्रिटनमधील रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन त्यांनी केलेल्या एका संशोधनात आढळून आले आहे की, नाशपातीच्या सालीत विटामिन सी तसेच फायबर आणि ब्रोमलेन याचा प्रचंड स्त्रोत होत आहे. तसेच चयापचय क्रिया व्यवस्थित ठेवून पोटातील मृत उतीना शरीराबाहेर टाकण्याचे काम करतो.

 

नाशपातीचा उपयोग कसा करावा?

 नाशपातीचे ज्यूस किंवा शेक किंवा सूप बनवून प्यावे.

 लसूण- हृदय रोग, स्ट्रोक

 द जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये छापून आलेल्या एका जपानी लेखामध्ये लसणाच्या साली बद्दल माहिती दिली होती. लसणाच्या सालींमध्ये फिनायल प्रोपेनॉईड नावाचे ऑंटी एक्सीडेंट जास्त प्रमाणात असते. रक्तदाब सोबतच शरीरातील कोलेस्ट्रोलचा थर कमी करण्याचा काम करतो. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

हेही वाचा : दररोज मोसंबी रस प्या, जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे

लसणाचा वापर कसा करावा?

 दररोज सकाळी लवकर रिकामा पोटी दोन लसणाच्या पाकळ्या साली  सहित चघळावी.

  संत्रा आणि मोसंबी

 रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिन या संशोधनात आढळून आले आहे की, संत्रा आणि मोसंबीच्या सालीमध्ये सुपर फ्लावोनोईड उपलब्ध असते. तसेच शरीरातील कोलेस्टेरॉलचे थर कमी करण्याचे काम करतो. तसेच अँटिऑक्सिडंट, तसेच रक्तप्रवाह सुरु असताना धमन्यांवर दबाव पडत नाही. त्यामुळे हृदयरोग आणि स्ट्रोकपासून बचाव होतो.

हेही वाचा : आजारी नाही पडणार तुम्ही खा ‘ही’ ७ फळे; वाढेल इम्युनिटी

 बटाटे- पचन व्यवस्थेतील दोष करते दूर

 जर्नल ऑफ मेडिकल प्लांट्समध्ये छापून आलेल्या एका संशोधनात पुढे केले होते की बटाट्याची साल हे झिंक, आयर्न, विटामिन सी, पोटॅशियम इत्यादीचा मुख्य स्त्रोत आहे. या सालीचा उपयोग रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी तसेच पचन व्यवस्था व्यवस्थित ठेवण्यासाठी होतो. त्वचा चमकदार तसेच डोळ्यांभोवती काळी वर्तुळे असतात ते दूर करण्यासाठी या बटाट्याच्या सालीचा उपयोग होतं.

 

बटाट्याचा वापर कसा करावा?

 बटाट्याची भाजी किंवा भरीत हे सालीसह करावे.

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters