चहा हे फक्त पेय नाही. तर हे काही लोकांसाठी जीव की प्राण आहे. काहीं लोकांच्या आयुष्यात चहा फारच महत्वाचा आणि तो त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. काही लोकांची चहाशिवाय सकाळ होत नाही. जवळच्या मित्राचे मन वळवण्याचा विषय असो की एखाद्या विशिष्ट विषयावर चर्चा असो, सगळ्याच ठिकाणी चहा हा ठरलेलाचं असतो.
एकंदरीत काय चहाचा घोट घेणे हे सर्वांनाच आवडते. चहाची क्रेझ अशी आहे की लोक दिवसातून 7-8 कप चहा पितात, परंतु चहाचे जास्त सेवन आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. आज आम्ही तुम्हाला चहामुळे होणाऱ्या हानीबद्दल सांगणार आहोत, तसेच दिवसातून किती कप चहा आरोग्यासाठी चांगला आहे, याविषयी सांगणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या माहितीविषयी.
चहा पिण्याचे तोटे
किती कप चहा पिणे योग्य आहे
डॉक्टर आणि पोषणतज्ञांच्या मते, दिवसातून 3-4 कप चहा पिणे सामान्य आणि चांगले आहे. यामुळे आरोग्याची फारशी हानी होत नाही, मात्र असे असले तरी सकस आहार घेतला पाहिजे. त्याच वेळी, 4 कपपेक्षा जास्त चहा पिणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे.
या लोकांनी चहा पिणे टाळावा
ज्या लोकांना कॅफिनची ऍलर्जी आहे त्यांनी चहा पिणे टाळावे. कारण चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे अॅलर्जीची समस्या वाढू शकते. त्याचबरोबर जे लोक निद्रानाश, अॅसिडिटी, आजार आणि अस्वस्थतेने त्रस्त आहेत, त्यांनीही चहाचे सेवन करू नये.
चहाचे अधिक सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम
चहाचे नियमित सेवन केले तर ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. चहाच्या अतिसेवनामुळे डिहायड्रेशन होते. याशिवाय चहाच्या सेवनाने हाडेही कमकुवत होतात, ज्यामुळे सांधेदुखीची समस्या उद्भवते. याशिवाय चहाचे जास्त सेवन केल्याने गॅस बनणे आणि आतड्यांसंबंधी समस्या देखील होऊ शकतात.
Share your comments