एलोवेरा अर्थात कोरफड एक औषधी वनस्पती आहे. यामध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी आरोग्यासाठी विशेष लाभ देत असतात. ॲलोवेरा ज्यूस मध्ये अनेक पौष्टिक घटक असल्याचे सांगितले जाते. यामध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, जिंक, सोडियम, यांसारखे खनिज पदार्थ आणि मोठ्या प्रमाणात विटामिन्स आढळत असतात. असे सांगितले जाते की ॲलोवेरा ज्यूस सकाळी अनाशेपोटी सेवन केले असता यापासून अनेक आश्चर्यकारक लाभ मिळत असतात. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी या ज्युसचे सेवन केले असता बद्धकोष्ठता आणि सांधेदुःखी या समस्यापासून आराम मिळतो.
मित्रांनो आपण एलोवेरा ज्युस घरीच बनवु शकता किंवा बाजारातून देखील खरेदी करू शकता. उन्हाळ्यात याचे सेवन अधिक फायदेशीर असल्याचे सांगितलं जाते. आज आपण एलोवेरा जूस सकाळी सकाळी रिकाम्या पोटी पिल्याने होणारे फायदे तसेच हा ज्युस कसा बनवायचा याविषयी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
हा ज्युस कसा बनवायचा?- मित्रांनो एलोवेरा ज्युस बनवण्यासाठी आपल्याला एलोवेरा जल, पाणी, मध, आणि लिंबू ची आवश्यकता भासणार आहे. हा ज्युस बनवण्यासाठी सर्वप्रथम एलोवेरा जेल आणि पाणी मिक्सर मध्ये बारीक करावे लागणार आहे. मिक्सरमध्ये चांगलं ब्लेंड झाल्यानंतर हा ज्यूस एका ग्लास मध्ये काढून घ्या त्यानंतर त्यामध्ये मध आणि लिंबू स्वादानुसार टाका. या पद्धतीने एलोवेरा जूस तयार केला जाऊ शकतो. आपण बाजारातून एलोवेरा जूस खरेदी देखील करू शकता.
एलोवेरा ज्युस पिण्याचे फायदे- डोकेदुखीमध्ये रामबाण:- मित्रांनो सध्या सर्वत्र कडाक्याचे ऊन पडत आहे, उन्हात गेल्यामुळे बर्याच लोकांना वारंवार डोकेदुखीची समस्या होते. ज्या व्यक्तीला डोकेदुखीची समस्या असते त्या व्यक्तीने एलोवेरा ज्युस रिकाम्या पोटी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो आणि डोकेदुखीतही चांगला आराम मिळतो.
अशक्तपणा कमी करण्यास मदत करते:- एलोवेरा ज्युस रिकाम्या पोटी सेवन केल्याने लाल रक्तपेशींची संख्या वाढत असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे ज्या व्यक्तींना अॅनिमिया असतो त्या व्यक्तींनी ॲलोवेरा ज्यूस चे सकाळी सकाळी सेवन करावे.
यामुळे ॲनिमिया दूर राहण्यास मदत होते. अशक्तपणा असल्यास शरीरातील लाल रक्त पेशींची संख्या किंवा शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्यामुळे एलोवेरा ज्युस पिला पाहिजे यामुळे थकवा आणि डोकेदुखी कमी होण्यास मदत होते.
बद्धकोष्ठता कमी करते- एलोवेरा ज्युस बद्धकोष्ठतेची समस्या असलेल्या व्यक्तींनी जरूर सेवन केले पाहिजे. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होत असल्याचा दावा केला जातो. यामुळे मानवी पचनसंस्था अर्थात पाचन तंत्र निरोगी राहण्यास मदत होते.
Share your comments