अनेक शेतात अनेक फळे पिकतात, प्रत्येक फळात काहींना काही तरी जीवनसत्त्व असतात. हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगी असतात. असेच एक फळ आहे ते म्हणजे स्टार फ्रुट. स्टार फ्रुट हे अमरस, कमरख याव नवानेही ओळखले जाते. स्टार फ्रुटमध्ये साइट्रिक अॅसिड असते यामुळे आपल्या शरिराला व्हिटॉमीन-सी मिळत असते. आपण या लेखातून स्टार फ्रुटविषयी जाणून घेणार आहोत.
स्टार फ्रुट हे एखाद्या चांदणीसारखे दिसते. कापल्यानंतर हे फळ चांदणीच्या आकारात दिसत असते. या फळाचे रंग हा फिकट हिरव्या रंगाचे असते. पिकल्यानंतर याचा रंग हा नारंगी र होत असतो. दरम्यान स्टार फ्रुट हे वर्षभर मिळत असते. वर्षभरात या फळाचे वर्षभरात दोनदा उत्पादन होत असते. या फळापासून आपल्याला अनेक जीवनसत्व मिळत असतात. दरम्यान व्हिटॉमीन -सी मिळाल्याने आपल्या शरिरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते. यासह पचन संस्थाही चांगली ठेवण्यास हे फळ उपयुक्त आहे. कारण यात फायबर अधिक असते. या फळाचे सेवन केले तर पोटसाफ राहण्यास मदत मिळते. पोटात गॅस राहण्याची समस्याही या फळामुळे दूर होत असते.
दरम्यान स्टार फ्रुटमध्ये व्हिटॉमीन - बी म्हणजे जीवनसत्व बीही असते. यासह आयर आणि मॅग्नेशिअम सारखे तत्वही आपल्या शरिराला मिळत असतात. यामुळे आपल्या शरिरातील रक्त प्रवाह सुरळीत राहत असतो. या फळाच्या सेवनाने आपण हार्ट अॅटक, स्ट्रोकसारख्या समस्या दूर राहतात. शिवाय रक्तात गाठीही होत नाहीत.
Share your comments