स्वयंपाकघरात सर्वाधिक वापरली जाणारी फळभाजी म्हणजे, बटाटा. घरात अनेकदा मोठ्या प्रमाणात बटाटे ठेवले जातात. मात्र, काही दिवस त्यांचा वापर न केल्यास, बटाट्यांना कोंब फुटतात. असे बटाटे आरोग्यासाठी फार हानीकारक असल्याचे 'नॅशनल कॅपिटल पॉयझन सेंटर'च्या अहवालात म्हटले आहे.
कोंब फुटलेले बटाटा आरोग्यासाठी कसा हानिकारक आहे, त्याचे परिणाम कसे समजून घ्यावे, त्यासाठी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या.
बटाट्यांमध्ये नैसर्गिकरित्या 'सोलेनिन' व 'चाकोनाइन' हे विषारी गुणधर्म असणारे घटक असतात.
ही लक्षणे दिसल्यास सावध
1) बटाट्यातील विषारी घटक शरीरात जास्त प्रमाणात पोहोचू लागले तर अनेक लक्षणे दिसतात. उदा. उलट्या, जुलाब आणि पोटदुखी. काही लोकांमध्ये त्याची लक्षणे सौम्य असू शकतात तर काहींमध्ये ही लक्षणे गंभीर स्वरूपात असतात.
2) स्थिती अधिक गंभीर झाल्यास, कमी रक्तदाब, ताप आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसतात.
कोंब न येण्यासाठी हे करा
1) जर बटाट्याला हिरवा रंग येत असेल किंवा आधीच कुठेतरी कोंब फुटला असेल तर तो काढून टाका.
2) जेथे सूर्यप्रकाश पोहोचत नाहीत अशा ठिकाणी बटाटे साठवा. ते साठवताना नेहमी कांद्यासारख्या घटकांपासून वेगळे ठेवा कारण त्यांनी सोडलेल्या गॅसमुळे बटाट्यांमध्ये कोंब येउ शकतात.
3) जर तुम्ही मोठ्या प्रमाणात बटाटे घेतले असतील तर तुम्ही ते कॉटनच्या पिशवीत ठेवू शकता. त्यातून हवा खेळती रहावी.
कोंब आलेले बटाटे खाणं आरोग्यासाठी हानिकारक ठरतं. कोंब येणं म्हणजे ती भाजी एका रासायनिक प्रक्रियेतून जात असल्याचे संकेत असतात. अशातच अशा भाजीचं सेवन करणं हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. बटाट्याला कोंब फुटल्यानंतर त्यामधील कार्बोहाड्रेट म्हणजेच 'स्टार्च'चे (starch) रूपांतर साखरेमध्ये होतं. त्यामुळे बटाटा नरम होतो.
बटाट्यामध्ये होणारे हे बदल सोलानिन आणि अलफा-कॅकोनिन नावाच्या दोन अल्कलॉइडच्या निर्मितीमुळे होते. सोलानिन हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक समजले जाते
बटाटे स्टोअर करण्याची योग्य पद्धत :
- बटाटे कधीही फ्रिजमध्ये ठेवू नयेत. त्यामुळे बटाट्यांमध्ये असलेल्या स्टार्चचं रूपांतर साखरेमध्ये होतं.
- बटाट्यामध्ये 78 टक्के पाणी असतं. त्यामुळे साधारणतः 5 ते 7 महिन्यांपर्यंत टिकतात. परंतु त्यासाठी ते थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवणं गरजेचं असतं.
- दमट वातावरणामध्ये किंवा हवा खेळती नसलेल्या ठिकाणी बटाटे ठेवल्याने बटाट्यांना कोंब फुटतात.
- बटाटे प्लास्टिक बॅगमध्ये न ठेवता ओपन व्हेजिटेबल बास्केटमध्ये ठेवणं फायदेशीर ठरतं.
Share your comments