1. आरोग्य सल्ला

कोलेस्टेरॉल कमी करते मोड आलेली मटकी

मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे. मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते. परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे.

KJ Staff
KJ Staff


मटकी हा भारतीय आहारामध्ये मध्ये आवर्जून वापरला जाणारा पदार्थ आहे.  मटकी कधीकधी भिजवून कच्ची खाल्ली जाते किंवा अर्धवट उकडून सुद्धा खाल्ली जाते.  परंतु आपल्याकडे जास्तीत जास्त प्रमाणात मोड आलेली मटकी खाण्याचे पद्धत आहे.  कारण मोड आलेल्या मटकीमध्ये असलेल्या गुणधर्मांमध्ये वाढ होते.  मटकी  हे आरोग्यासाठी फार आवश्यक असा कडधान्य आहे.  तर मग जाणून घेऊयात मटकी खाण्याचे फायदे.

  • प्रोटीनचा स्त्रोत- मटकीमध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनांचा स्रोत आहे. तिच्यात भरपूर प्रमाणात प्रोटीन असते.  जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा डॉक्टरांनी तुम्हाला मांसाहार न करण्याचे सांगितले असेल तर शरीराला असणाऱ्या प्रथिनांची गरज मटकीच्या सेवनाने भरून निघते.
  • मलावरोध दूर होतो-  मलावरोधाची समस्या असल्यास आपल्या आहारात फायबरचे कमतरता असते.  जर आपण आहारात मटकीचा समावेश केला तर त्यामुळे भरपूर प्रमाणात फायबर मिळते.  त्यामुळे आपल्याला होणारा मलावरोधाचा त्रास कमी होतो.
  • रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहते-  तज्ञांच्या मते, मटकीमुळे आपल्या शरीराला फायबर मिळते, त्यामुळे साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण राहते.  भारतात किती प्रमाणात साखर असावी यावर फायबर नियंत्रण करतात.  त्यामुळे डायबिटीसग्रस्तांनी  मटकीचे सेवन केल्यास त्याचा भरपूर आरोग्यासाठी फायदा होतो.
  • ॲनिमिया पासून संरक्षण- गरोदर महिला आणि मासिक पाळीत अतिरक्तस्राव होणाऱ्या महिलांना विशेषता ॲनिमियाचा धोका जास्त असतो.  आहारात जास्त प्रमाणात आयर्न युक्त पदार्थांचा समावेश करणे हे ॲनिमिया होऊ नये यासाठी उपयोगी असतं. म्हणून मटकीमध्ये आयर्नचा स्त्रोत मोठ्या प्रमाणात असतो. म्हणून मटकी खाल्ल्याने ॲनिमिया होण्यापासून बचाव होतो.
  • रक्तदाब कमी होतो-  रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल वाढल्यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तदाब वाढू शकतो. हे कोलेस्टेरॉल कमी करण्याचे काम शरीरातील फायबर करते. तसेच मटकी तील पोटॅशियममुळे रक्तवाहिन्यांचे काम सुरळीत चालतं त्यामुळे रक्तदाब कमी राहतो. मटकीमध्ये फायबरचे प्रमाण असल्यामुळे त्याचा फायदा होतो.
  • सौंदर्य वाढवण्यासाठी उपयोग- मटकीमध्ये आढळणारे प्रोटीन हे अमिनो ऍसिड युक्त असतात. त्यामुळे त्वचा सुंदर होण्यासाठी मदत होते. तसेच आपल्या त्वचेला झालेली जखम भरून काढण्यासाठी सुद्धा अमिनो ऍसिडचा उपयोग होतो.

     म्हणून आपण घेत असलेल्या संतुलित आहारामध्ये जर मटकीचा पुरेसा प्रमाणात वापर केल्यास आपल्याला त्याचा आरोग्यासाठी भरपूर प्रमाणात फायदा होऊ शकतो.

English Summary: Sprouted matki Lowering Cholesterol Published on: 26 August 2020, 10:36 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters