सध्याच्या आहारामुळे आणि आपल्या काही सवयीमुळे अनेकांना अनेक छोट-मोठ्या आजारांना सामोरे जावे लागते. विशेषता रात्री उशिरा जेवणे, जास्त जड खाणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे या सवयीमुळे लठ्ठपणासह अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागते.
जेवढे खातो त्याबरोबर आपल्या खाण्याची पद्धती देखील योग्य असणे महत्वाचे आहे. जर तुम्हालाही जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असेल, तर हेच तुमच्या अनेक आजारांचे कारण ठरू शकते. त्यामुळे अशावेळी सावधान राहण्याची गरज असते.
छोट-मोठे आजार टाळण्यासाठी तुम्हाला काही सवयी बदलाव्या लागतील. सर्वात पहिल्यांदा दिवसा जेवल्यानंतर झोपत झोपणे बंद करा. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर कोणते आजार होऊ शकतात? याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया.
1) रक्तातील साखरेची पातळी
जेवल्यानंतर शरीरातील साखरेची पातळी वाढते. जेवल्याबरोबर झोपायची सवय असेल तर साखर शरीरात वापरली जात नाही आणि जास्त साखर रक्तात विरघळू लागते. डॉक्टरांच्या मते, रात्रीचे जेवण केल्यानंतर लगेच झोपल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढू शकते. यामुळे वजन वाढतेच याबरोबर अनेक छोट-मोठे आजार होतात.
शेतकऱ्यांनो जनावरांना योग्य आहार देऊन वाढवा रोगप्रतिकारक्षमता; होईल चांगला फायदा
2) अपचन
जेवल्यानंतर लगेच झोपल्याने शरीरातील बहुतेक अवयव स्थिर होतात आणि शरीराच्या पचनासह अनेक कार्ये मंदावतात. यामुळे तुमचे अन्न नीट पचत नाही. यामुळे जे लोक जेवल्यानंतर झोपी जातात. त्यांना उठल्यानंतरही पोट भरलेले वाटते. त्यामुळे बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.
3) लठ्ठपणा
रात्री उशिरा जेवल्याने शरीरातील ग्लुकोजची पातळी बिघडते. याशिवाय अन्न खाल्ल्यानंतर लगेच झोप लागल्याने शरीरातील चयापचय क्रियेवर परिणाम होतो आणि लठ्ठपणा वेगाने वाढू लागतो. याशिवाय झोप आणि आरोग्य या दोन्हींवर परिणाम होतो. जेवल्यानंतर किमान 2 तास झोपू नका.
महत्वाच्या बातम्या
शेतकरी मित्रांनो गाय, म्हैस आणि शेळीच्या या जातींचं पालन करा; होईल मोठा फायदा
दिलासादायक! सांगली जिल्ह्यातील 61 हजार शेतकऱ्यांना उद्या मिळणार प्रोत्साहन अनुदान
रब्बी हंगामासाठी नवीन ज्वारीचे वाण विकसित; शेतकऱ्यांना होणार दुहेरी फायदा
Share your comments