लसूण एक प्रमुख मसाल्याचा पदार्थ आहे आणि हा पदार्थ मोठ्या प्रमाणात भारतीय स्वयंपाक घरात वापरला जातो जवळपास कुठलीच भाजी हि लसून शिवाय बनवली जात नाही. लसुन टाकल्याने पदार्थाला एक वेगळीच चव येते त्यामुळे याचा वापर खूप मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच लसूण हे मानवी शरीराला खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते, त्यामुळे लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात अन्नपदार्थात होताना दिसतो. मात्र असे असले तरी लसणाचे आपल्या शरीराला फक्त फायदेच होत नाही तर यामुळे काही तोटे देखील बघायला मिळतात विशेषता ज्या लोकांना आधीच काही आजार जडलेले असतात त्या लोकांना याचे सेवन महागात पडू शकते. म्हणून आज आपण नेमक्या कोणत्या लोकांनी याचे सेवन करू नये याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया लसनाचे साइड इफेक्ट्स.
या लोकांनी लसूनचे सेवन करू नये
सर्जरी झालेल्या व डायबेटीस असलेल्या लोकांनी
मित्रांनो तसं बघायला गेलं तर लसुन मानवी आरोग्यासाठी खूपच फायदेशीर असतो. लसुन एक गरम पदार्थ आहे म्हणून याचे सेवन हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात केले जाते. हिवाळ्यात अनेक प्रकारच्या सूपमध्ये लसुन चा उपयोग केला जातो. आयुर्वेदात लसुन मानवी शरीराला उपयोगी असल्याचे सिद्ध झाले आहे, मात्र असे असले तरी काही लोकांनी याचे सेवन करणे टाळावे. ज्या लोकांना डायबिटीज आहे व रक्त पातळ करण्याच्या गोळ्या चालू आहेत अशा लोकांनी लसूणचे सेवन करु नये. तसेच ज्या लोकांची सर्जरी झालेली आहे त्या लोकांनी देखील लसूणचे सेवन करू नये. लसुन मध्ये एंटीथ्रॉम्बोटिक घटक मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगितले जाते, याचा अर्थ असा आहे की लसुन रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून वाचविते. मात्र आधीच जर आपण ब्लड थिनर घेत असाल तर याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होऊ शकतो. म्हणून अशा लोकांनी लसणाचे सेवन करणे आधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक ठरते.
ऍसिडिटी असलेल्या लोकांनी
ज्या लोकांना पोटासंबंधी विकार असतात त्या लोकांनी देखील लसणाचे सेवन करू नये. विशेषता ज्या लोकांना ऍसिडिटी असते त्यांनी याचे सेवन करणे टाळावे. तसेच ज्या लोकांना पोटात गोळा येत असेल अथवा गॅसचा प्रॉब्लेम असेल त्या लोकांनी देखील लसणाचे सेवन टाळावे. आहार तज्ञांच्या मते, लसूणमध्ये फ्रुकटेन नामक घटक असतो, जर याचे जास्त प्रमाणात सेवन केले गेले तर हा घटक छोट्या आतड्यात लवकर शोषला जात नाही त्यामुळे अपचन सारख्या समस्या होऊ शकतात. आणि ज्या लोकांना आधीच पोटासंबंधी विकार आहेत त्या लोकांच्या समस्येत अजूनच भर पडू शकते.
लो ब्लड प्रेशर असलेल्या लोकांनी
आयुर्वेदानुसार ज्या लोकांना हाय ब्लड प्रेशर असतो त्या लोकांनी सकाळी सकाळी लसणाचे सेवन केले तर यामुळे या समस्येत आराम मिळतो, मात्र ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची समस्या आहे त्यांनी याचे सेवन करू नये असा सल्ला दिला जातो. कारण की यामुळे शरीरातील ब्लड फ्लो अजूनचस्लो होऊ शकतो. आणि त्यामुळे सहाजिकच ब्लड प्रेशर अजूनच लो होऊ शकतो. म्हणून ज्या लोकांना लो ब्लड प्रेशरची समस्या असते त्या लोकांनी चुकूनही लसणाचे सेवन करू नये.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Share your comments