1. आरोग्य सल्ला

Side Effects Of Sweet Potato: रताळे खाण्याचे फायदे तर होतातच पण याच्या सेवणाने काही दुष्परिणाम देखील होतात

रताळे एक कंदवर्गीय फळपीक आहे. रताळेचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. रताळे (Sweet Potato) उपवासात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. याचे सेवन बारामाही केले जाते, मात्र हिवाळ्यात (In winter) हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने याचे सेवन हिवाळ्यात जास्त केले जाते. हे एक असं फळ आहे ज्याचे सेवन प्रत्येकजन मोठ्या चविने करत असतो. रताळ्याचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जातो. रताळ्याचे शिकरण, हलवा, मुरंबा, चटणी इत्यादी पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जाते.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
side effects of sweet potato

side effects of sweet potato

रताळे एक कंदवर्गीय फळपीक आहे. रताळेचे मोठ्या प्रमाणात सेवन केले जाते. रताळे (Sweet Potato) उपवासात जास्त प्रमाणात खाल्ले जाते. याचे सेवन बारामाही केले जाते, मात्र हिवाळ्यात (In winter) हे मुबलक प्रमाणात उपलब्ध होत असल्याने याचे सेवन हिवाळ्यात जास्त केले जाते. हे एक असं फळ आहे ज्याचे सेवन प्रत्येकजन मोठ्या चविने करत असतो. रताळ्याचा आहारात वेगवेगळ्या प्रकारे समावेश केला जातो. रताळ्याचे शिकरण, हलवा, मुरंबा, चटणी इत्यादी पदार्थ तयार करून त्याचे सेवन केले जाते.

रताळे जसे चवीला रुचकर (Delicious) लागतात तसेच त्यात असणारे औषधी गुणधर्म (Medicinal properties) मानवी शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. यात प्रामुख्याने विटामिन बी 6, अँटिऑक्सिडंट, फायबर असे अनेक पोषकतत्वे उपलब्ध असतात. जे की मानवी शरीराला अनेक प्रकारे फायदे पोहोचवीत असतात. याच्या सेवनाने डायबिटीस सारख्या महाभयंकर आजारांवर देखील नियंत्रण मिळवले जाऊ शकते. तसेच डायबिटीस (Diabetes) असलेल्या रूग्णांसाठी याचे सेवन नुकसानदायक ठरत नाही. असे असले तरी रताळे खाण्याचे काही दुष्परिणाम देखील मानवी शरीराला होत असतात. आज आपण रताळे खाण्याने होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत.

Side Effects Of Sweet Potato

मुतखडा असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन टाळावे

मुतखडा (Kidney stone) अर्थात किडनी स्टोन असलेल्या व्यक्तींनी रताळ्याचे सेवन करू नये (Don't consume Sweet Potato) असा सल्ला दिला जातो. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, रताळ्यामध्ये ओकसॉलेट नामक घटक असतो, जे की एका प्रकारचे कार्बनिक आम्ल असते.यामुळे मुतखडा व किडनी स्टोन या समस्येत वाढ होऊ शकते. त्यामुळे मुतखडा असलेल्या व्यक्तीने याचे सेवन शक्यतोवर करू नये किंवा आपल्या डॉक्‍टरांच्या सल्ल्याने याचे सेवन करावे.

एलर्जी असलेल्या व्यक्तीने याचे सेवन करू नये

रताळ्याचे जास्त सेवन केल्याने यापासून विविध प्रकारची ऍलर्जीची (Allergies) समस्या उत्पन्न होऊ शकते. रताळे एक मेनीटोल युक्त पदार्थ असते, त्यामुळे याचे सेवन केल्याने ऍलर्जी होऊ शकते तसेच ज्या लोकांना आधीच ऍलर्जीची समस्या आहे त्यांनी देखील रताळ्याच्या सेवन टाळावे यामुळे त्यांच्या समस्येत वाढ होऊ शकते.

पोटासंबंधित विकार वाढू शकतात

ज्या लोकांना नेहमीच पोटासंबंधी कुठले ना कुठले विकार असतात त्या लोकांनी रताळ्याची सेवन करणे टाळावे. रताळ्या मध्ये असलेले मेनीटोल घटक जे की एक प्रकारचे कार्बोहाइड्रेट असते. याला शुगर अल्कोहोल किंवा पॉलीपोल म्हणून संबोधले जाते. या कार्बोहायड्रेट मुळे मानवी शरीरात पोटासंबंधित आजार (Stomach related ailments) उत्पन्न होऊ शकतात. यामुळे पोट दुखी सारखे आजार उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे आधीच पोटात संबंधित विकार असलेल्या व्यक्तीने तसेच कोणत्याही व्यक्तीने याचे प्रमाणाबाहेर सेवन करू नये यामुळे पोटा संबंधित विकार जडू शकतात.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagaran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: side effect of sweet potatoes Published on: 11 January 2022, 08:47 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters