1. आरोग्य सल्ला

फुलकोबी सारखी दिसणारी ब्रोकली खावावी का ? काय आहेत गुण जाणून घ्या !

फुलकोबी सारखी दिसणारी ब्रोकली आपण पाहिली आहे का? फुलकोबी ही सफेद असते तर ब्रोकली ही हिरव्या रंगाची असते. फुलकोबी प्रमाणे आकाराने वाढणाऱ्या ब्रोकलीमध्ये फुलकोबीपेक्षा अधिक गुण आहेत. पण दोन्ही भाज्या एकाच घरातील आहेत.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव

फुलकोबी सारखी दिसणारी ब्रोकली आपण पाहिली आहे का? फुलकोबी ही सफेद असते तर ब्रोकली ही हिरव्या रंगाची असते. फुलकोबी प्रमाणे आकाराने वाढणाऱ्या ब्रोकलीमध्ये फुलकोबीपेक्षा अधिक गुण आहेत. पण दोन्ही भाज्या एकाच घरातील आहेत. पण फुलकोबीऐवजी ब्रोकली खावावी का ? याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. हे दोन्ही जंगली वनस्पती आहेत, परंतु या दोघां पिकांची शेती वेगळ्या पद्धतीने केली जाते. दोन्ही रोपांचा आकार सारखा असतो. वजन कमी करणे, अधिक ऊर्जा मिळवून देणे, पचन शक्ती वाढविण्यासाठी हे दोन्ही फायदेकारक आहेत.

दोन्ही भाज्यांचा आकार सारखाच असतो. परंतु ब्रोकली अधिक पसरलेली दिसते तर  फुलकोबी ही एखाद्या गु्च्छाप्रमाणे दिसते. काही जानकारांच्या मते, ब्रोकलीमध्ये फुलकोबीपेक्षा अधिक जीवनसत्व असतात.  ज्यांना अशक्तपणाचा त्रास आहे, त्यांनी ब्रोकली खावी.

का खावी ब्रोकली

ब्रोकलीचे उत्पन्न हे क्रॉस- पॉलिनेशनच्या मदतीने घेतले जाते. काही भागातील लोक याला फुलकोबी म्हणतात. खेळाडू आणि शारिरीक कष्टाचे काम करणाऱ्यांसाठी ब्रोकली हे उत्कृष्ट भोजन आहे. ज्यांना हृदयाचे आजार आहेत त्यांच्यासाठी ब्रोकली खाणे खूप फायदेकारक आहे. कॅन्सरच्या उपचारासाठी ब्रोकली चांगले असल्याचा दावा काही जाणकार करतात. तर फुलकोबी खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते तर त्वचा रोगांपासून आपले संरक्षण होते.

 

English Summary: Should we eat broccoli that looks like cauliflower? know the benefits Published on: 08 July 2020, 05:48 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters