देशात सर्वत्र थंडीचा कोहराम नजरेस पडत आहे, आणि या थंडीच्या दिवसात आहारावर विशेष लक्ष द्यावे लागते. थंडीच्या दिवसात मानवाची रोगप्रतिकारक क्षमता (Immunity) कमी होत असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे हिवाळ्यात रोगप्रतिकारक क्षमता वाढविणारे अन्नपदार्थांचे सेवन केले पाहिजे. हिवाळ्यात तिळीचे सेवन केल्याने मानवी शरीरातील रोगप्रतिकारक क्षमता वाढते. हिवाळ्यात तिळीचे लाडू मोठ्या प्रमाणात खाल्ले जातात, तिळीचे लाडू चवीला तर स्वादिष्ट असतातच याशिवाय यामध्ये असलेल्या औषधी गुणधर्ममुळे (Due to its medicinal properties) याच्या सेवनाने मानवी शरीराला अनेक फायदे पोहोचत असतात. आज आपण तिळीचे सेवन केल्याने मानवी शरीराला होणाऱ्या आश्चर्यकारक फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर.
तिळीचे सेवन केल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे (Amazing benefits of consuming Sesame)
बद्धकोष्टता असल्यास तिळीचे सेवन फायदेशीर ठरते- आहारतज्ञ तिळीचे सेवन करण्याचा सल्ला देत असतात, तिळीमध्ये फायबर आणि अनसेचूरेटेड फॅट्टी ऍसिड (Fiber and unsaturated fatty acids) मोठ्या प्रमाणात आढळत असतात. यामुळे तिळीचे नियमित सेवन केल्याने बद्धकोष्टता सारख्या पोटासंबंधित विकारावर मात केली जाऊ शकते. तिळीचे तेल मानवी शरीरातील आतड्यांसाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.
दातांसाठी ठरते फायदेशीर- तिळीचे नियमित सेवन केल्याने दातासंबंधित अनेक विकार दूर केले जाऊ शकतात. यामुळे दात किडणे आणि हिरड्यांचे विविध विकार (Tooth decay and various gum disorders) दूर केले जाऊ शकतात. आहारतज्ज्ञांच्या मते सकाळी रिकाम्या पोटी भाजलेल्या तिळीचे सेवन केल्याने दाता संबंधित अनेक प्रकारचे विकार दूर केले जातात.
हाडे मजबूत करण्यास फायदेशीर
तिळीचे नियमित सेवन केल्यानेमानवी शरीरातील हाडे मजबूत होण्यास मदत मिळते. तिळीमध्ये आढळणारे पोषक घटक मानवी शरीरातील हाडांना मजबुती प्रदान करण्यास कारगर सिद्ध होतात. यामध्ये प्रोटीन आणि अमिनो ऍसिड (proteins and amino acids) मोठ्या प्रमाणात आढळते हे पोषक घटक शरीरातील हाडांना मजबुती देण्यासाठी विशेष कार्गर असतात म्हणून तिळीचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो.
Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagaran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Share your comments