जगभरात कोरोनासोबत आता मंकीपॉक्स (Monkeypox) लोकांच टेन्शन वाढवत आहे. याचं कारण म्हणजे 80 देशांमध्ये आता 21 हजारहून अधिक मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. यामध्ये भारतातही मंकीपॉक्सचे रुग्ण सापडले आहेत.
आफ्रीकेमध्ये आतापर्यंत 75 लोकांचा या व्हायरसने मृत्यू झाला आहे. त्यापाठोपाठ आता ब्रिटनमध्येही या व्हायरसचा (virus) दुसरा बळी गेला आहे. ब्राझिलमध्ये मंकीपॉक्सचा एक बळी तर ब्रिटनमध्ये (Britain) दोन बळी गेले आहेत.
हे ही वाचा
Land Aadhaar Card: आता जमिनीचेही मिळणार आधारकार्ड; नवीन शासन निर्णय जारी
स्पेनच्या आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या (Spain Ministry of Health) माहितीनुसार तिथे आतापर्यंत 4 हजारहून अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे. यामध्ये 3500 पुरुषांचा समावेश आहे. तर महिलांची संख्या 64 आहे. युरोपीय संघात 5300 लोकांना मंकीपॉक्स होऊ नये म्हणून लस देण्यात आली आहे.
हे ही वाचा
Crop Insurance Scheme: पीकविम्याचे धोरण बदलले; शेतकऱ्यांना होणार 'हा' मोठा फायदा, जाणून घ्या..
मंकीपॉक्सची लक्षणं
या आजारात ताप, पुरळ आणि अंगावर गाठीसारखे फोड उठतात किंवा रॅश (rash) येतात. या आजाराची लक्षणं साधारण 2 ते 4 आठवड्यांमध्ये दिसतात. काही रुग्णांमध्ये ही लक्षणं गंभीर दिसतात. यापैकी कोणतीही लक्षणं तुम्हाला आढळली तर तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घ्या.
महत्वाच्या बातम्या
Cotton Varieties: देशी कापसाचे नवीन वाण 160 दिवसात तयार; जाणून घ्या 'या' वाणाविषयी
Horoscope: 'या' 4 राशीचे लोक असतात खूप सरळ स्वभावाचे; जाणून घ्या 'या' राशीविषयी
Rules Change: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; 1 ऑगस्टपासून होणार मोठे बदल
Share your comments