आजचे युग हे हायब्रीड चे युग आहे त्यामुळं च्या युगात लोकांना वेगवेगळे रोग आणि आजार होत आहेत. यामधे कॅन्सर, टिबी, क्षयरोग, दमा, डायिटीस अश्या प्रकारचे जीवघेणे आजार होत आहेत. त्यासाठी आपल्या शरीराला सर्वात उपयुक्त म्हणजे आहार आणि व्यायाम आहे.
हल्ली बाऱ्यापैकी लोक उच्च कोलेस्ट्रॉल च्या त्रासामुळे त्रस्त त्रस्त आहेत. बऱ्याच वेळा उपचार घेऊन सुद्धा यावर काही फरक पडत नाही शरीरातील आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करायचे असेल तर दैनंदिन आहारात तुम्हाला या पदार्थांचे सेवन करणे खूप गरजेचे आणि फायदेशीर आहे.
शरीरातील वाढते कोलेस्ट्रॉल हे हृदयाच्या विकाराला आमंत्रण देत असते. या साठी पौष्टिक आहार आणि पौष्टिक घटक खूप गरजेचे आहेत. या साठी दैनंदिन जीवनात आपल्याला हिरव्या पालेभाज्या फळे पालेभाज्या कडधान्ये ज्यूस यांचा वापर जास्त प्रमाणात करायला हवा.
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काही घरगुती उपाययोजना:-
1)अक्रोड:-
अक्रोड मध्ये मुबलक प्रमाणात एनर्जी आणि स्निग्ध पदार्थ असतात जर का तुम्ही दिवसात 2 ते 3 अक्रोड खाल्ले तरी तुमच्या शरीरात मोठ्या प्रमाणात एनर्जी मिळते. अक्रोड मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात यामधे कॅल्शियम, मॅग्नेशियम, ओमेगा – 3, फायबर, कॉपर ,फॉस्फोरससारखे पौष्टिक घटक आढळतात . जर आपण नियमित अक्रोड चे सेवन केले तर शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये
साठलेले कोलेस्ट्रॉल वितळते आणि आपल्याला कोलेस्ट्रॉल चा त्रास कमी होण्यास मदत होते.
2)लसूण:-
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी सर्वात फायदेशीर आणि उपयुक्त पदार्थ म्हणजे लसूण. आपल्या दैनंदिन आहारात लसणाचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो तसेच दिवसातून कमीत कमी लसणाच्या 2 पाकळ्या तरी खाणे गरजेचे आहे लसणामध्ये अशी काही एंजाईम्स सापडतात जे की आपल्या शरीरातील एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी करतात.
हेही वाचा:-रात्री झोपेत जास्त घाम येण्याची ही असू शकतात कारणे,जाणून घ्या
3)सोयाबीन:-
सोयाबीन्, डाळ आणि मोड आलेले कडधान्य हे रक्तातील असणारे एलडीएल कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी लिव्हरची खूप मदत करतात. त्यामुळे आहारात सोयाबीन चे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते आहे. त्याचबरोबर मोड आलेली कडधान्य फळे यांचा सुद्धा आहारात समावेश करावा.
4)लिंबू:-
लिंबाला व्हिटॅमिन सी चा स्रोत मानला जातो. लिंबामध्ये आढळनारे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असते शिवाय लिंबामधे फायबर युक्त गुणधर्म असतात हे फायबर युक्त गुणधर्म आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करत असतात.
हेही वाचा:-पांढऱ्या साखरेपेक्षा ब्राऊन शुगर आहे शरीरास खूप फायदेशीर? जाणून घ्या सविस्तर
Share your comments