1. आरोग्य सल्ला

जाणून घ्या! औषधी झेंडूचे गुण; त्वचा संबंधी विकारांना करतो दूर

झेंडुच्या फुलाला मोठी पसंती असते, सत्कार असो किंवा विवाह समारंभ प्रत्येक ठिकाणी झेंडूची फुले असतातच. झेंडूशिवाय कार्यक्रम पुर्ण होतच नाही, पण या झेंडूचे वैशिष्ट्य माहित आहे का? प्रत्येक ठिकाणी मान घेणाऱ्या झेंडूच्या वाढीसाठी आणि फुले येण्यासाठी काही विशेष प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही. याशिवाय झेंडूच्या झाडाला रोगाचा प्रादुर्भाव पण कमी लागत असतो.

KJ Staff
KJ Staff
marigold's qualities

marigold's qualities

झेंडुच्या फुलाला मोठी पसंती असते सत्कार असो किंवा विवाह समारंभ प्रत्येक ठिकाणी झेंडूची फुले असतातच.  झेंडूशिवाय कार्यक्रम पुर्ण होतच नाही,  पण या झेंडूचे वैशिष्ट्य माहित आहे का? प्रत्येक ठिकाणी मान घेणाऱ्या झेंडूच्या वाढीसाठी आणि फुले येण्यासाठी काही विशेष प्रकारची मेहनत घ्यावी लागत नाही.  याशिवाय झेंडूच्या झाडाला रोगाचा प्रादुर्भावही  कमी होत असतो.   फुलांच्या शेतीमध्ये झेंडू हा सर्वोत्तम पर्याय असतो.  इतर कार्यक्रमांशिवाय या फुलांचा दुसऱ्याकामांसाठीही उपयोग होतो. झेंडुच्या फुलांची हे गुण कादाचितच आपल्याला माहिती असतील.  झेंडूच्या फुलांचा उपयोग औषध म्हणून पण होतो.  डोके दुखत असेल, दात दुखत असतील किंवा इतर आजर असतील त्यासाठी झेंडू हे फायदेशीर असते.  या फुलांच्या अजून काही औषधी गुणांविषयी आपण जाणून घेऊ...

झेंडूच्या फुलांचे औषधी गुण

  • त्वचेसाठी झेंडू आहे फायदेशीर

झेंडूचा वापर त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. हे जळणे, आणि पुरळ सारख्या आजारांना बरे करते.  हा त्वचेच्या बर्‍याच रोगांच्या उपचारांमध्ये वापरला जातो.  झेंडूची पेस्ट त्वचेवर लावल्यास सूज, लालसरपणा आणि कोरडेपणाचा त्रास दूर होतो. झेंडू शरीर स्वच्छ करण्यासाठी फायदेशीर आहे. हे सर्व विषारी घटक काढून शरीर स्वच्छ करते, अशा या गुणकारी झेंडूची लागवड कशी करावी, आपल्याकडील जमीन त्यासाठी योग्य आहे का? याची माहिती घेऊया...

झेंडूची लागवड वेगवेगळ्या प्रकारच्या मातीमध्ये करता येते. सर्वसाधारणपणे प्रत्येक प्रकारची माती यासाठी उपयुक्त आहे,  परंतु व्यवसायाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, चिकणमाती माती सर्वोत्तम आहे. आपण निवडत असलेल्या ठिकाणी ड्रेनेजची सुविधा असणे महत्वाचे आहे.  

हेही वाचा:वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे इसबगोल

झेंडूच्या फुलचा ठिकाणा तरी कोणता

मुळात झेंडू आहे कुठला याचा अजून संभ्रम आहे. इतिहासकारांचा असा विश्वास आहे की,  झेंडूचे मूळ निवासस्थान इजिप्त असावे. तेथून ते रोम आणि ब्रिटनमध्ये आणले गेले असावे. हे प्राचीन ग्रीसमध्ये सजावट आणि इतर कारणांसाठी फार पूर्वीपासून वापरले जात आहे.

झेंडूच्या लागवडीसाठी उष्ण आणि समतोष्ण हवामान योग्य मानले जाते.  जास्तीत जास्त उष्णता आणि हिवाळा वनस्पतींसाठी चांगले नाहीत.  ते १५ ते ३० डिग्री सेल्सिअस तापमानात या फुलांची बाग फुलत असते. 

English Summary: read here to know marigold's qualities; useful for skin and another Diseases Published on: 21 April 2020, 05:30 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters