लठ्ठपणा अन् मधूमेहावर उपायकारक आहे क्किनोआ

25 June 2020 05:32 PM


आपले आरोग्य हे आपल्या जिवनशैलीवर निर्भर असते. आपण काय खातो काय पितो यावर आपली प्रकृती टिकून असते. सध्याच्या काळात नागरिक अन्नपदार्थाविषयी जागृत होताना दिसत आहेत. परंतु नोकरी करणारे आणि शहरात धकाधकीचे जीवन जगणारे नेहमी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत असते. यामुळेच आजारांचे प्रमाण वाढले आहे. सगळ्यांमध्ये सहजपणे दिसून येणारी समस्या म्हणजे लठ्ठपणा लठ्ठपणा आला की त्यांच्या बरोबर इतर आजारही आपल्या शरिरात प्रवेश करत असतात. यामुळे आहार हा नेहमी पोष्टीक असला पाहिजे.  आज आपण अशाच एका धान्याविषयी माहिती घेणार आहोत, जे या प्रकाच्या समस्यावर उपयोगी आहे. आपला लठ्ठपणा कमी करण्यास किंवा आपले शरीर लठ्ठ न होऊ देण्यास मदत करते. क्किनोआ हा धान्याचा प्रकार आहे, याच्या सेवानाने आपल्या शरिरातील साखरेचे प्रमाण ही व्यवस्थित राहते. म्हणजे काय तर मधुमेह झालेल्यांना धान्य फार फायदेकारक आहे.

क्विनोआ एक गुणकारी भरडधान्याचा प्रकार असून लाल, काळ्या व पांढऱ्या रंगामध्ये  उपलब्ध आहेत.

 • पांढरा क्विनोआ: सर्व सामान्यपणे पांढरा क्विनोआ हा बाजारामध्ये सहजतेने उपलब्ध असतो व त्याला आयव्हरी क्विनोआ म्हणूनही ओळखले जाते.
 • लाल क्विनोआ : या प्रकारातील क्विनोआ दाण्याचा रंग लाल असून शिजवल्यानंतरही त्याचा रंग लालच राहतो.
 • काळा क्विनोआ : हा गोडसर चवीचा असून दाण्याचा रंग हलका तपकिरी ते काळसर रंगाचा असतो.

आणि शिजवल्यानंतरही त्याचा रंग काळा राहतो.

क्विनोआतील  पोषण तत्वे (१०० ग्रम  क्विनोआतील  पौष्टिकता ):

१०० ग्रम  क्विनोआत खालील प्रमाणात पौष्टिक तत्व आढळून येतात.

उष्मांक : १२० किलो कॅलरी

पाणी: ७२ %

प्रथिने:४.४  ग्रॅम

कार्बन: २१.३  ग्रॅम

कर्बोदके: ०.९  ग्रॅम

तंतुमय पदार्थ: २.८  ग्रॅम

स्निग्ध पदार्थ: १.९  ग्रॅम

संतृप्त : ०.२३  ग्रॅम

मोनोसॅच्युरेटेड: ०.५३  ग्रॅम

पॉलीअनसॅच्युरेटेड: १.०८  ग्रॅम

ओमेगा- ३ : ०.०९  ग्रॅम

ओमेगा-६ : ०.९७ ग्रॅम

ट्रान्स फॅट

क्विनोआचे आरोग्यासाठीचे फायदे

क्विनोआ गुणकारी धान्यात अनेक औषधी गुणधर्म आहेत.

 1. वजन कमी करण्यात फायदेशीर

अतिरिक्त वजन असणा-या व्यक्तींनी आपल्या आहारात क्विनोआ या गुणकारी धान्याचा समावेश करावा. यात मोठ्या प्रमाणात असलेल्या उच्च प्रतीचे प्रथिनामुळे क्विनोआ कोलेस्ट्रोल फ्री आणि कमी स्निग्ध पदार्थ असणारा पदार्थात मोडतो. एक कप शिजवलेल्या क्विनोआत २०० किलो कॅलरी उष्मांक, ३.४ ग्रॅम स्निग्धपदार्थ, ३ ग्रॅम तंतुमय, ८.१४ ग्रॅम प्रथिने असतात. समतोल आहारासाठी क्विनोआचा वापर आपण दैनंदिन आहारात करू शकतो.

 1. सुदृठ निरोगी हृदय:

शरीराचा सर्वात महत्वाचा भाग हृदय असते आणि हृदया संबंधित कोणत्याही समस्या असल्यास मृत्यू होऊ शकतो. शरीरातील अत्याधिक प्रमाणात चरबी व कोलेस्ट्रोल रक्तवाहिन्यात जमा झाल्याने धमनीकाठीन्य यासारखा हृदयरोग होण्याची दाट शक्यता असते. क्विनोआतील प्रथिने हे कोलेस्ट्रोल फ्री असल्याकारणाने क्विनोआचे आहारात समावेश केल्यास कोलेस्ट्रोल नियंत्रणात ठेऊ शकतो.

 1. मधुमेह :

मधुमेह हा एक गंभीर शारीरिक आजार असून यात रुग्णाच्या रक्तातील साखरेची पातळी जास्त असते. वेळेत जर नियंत्रण केले नाही तर अनेक घातक परिणामांना तोंड द्यावे लागते. क्विनोआ हे संपूर्ण धान्य असून मधुमेही रुग्णांसाठी  गुणकारी आहे. मधुमेहीच्या आहारात याचा समावेश केल्यास यात असणारे कर्बोदके व  तंतुमय पदार्थ  रक्तातील साखरचे प्रमाण वाढू देत नाही. आणि रक्तशर्करा व वजन नियंत्रणात राहते. त्यामुळे क्विनोआचे सेवन मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरते.

 1. वृद्धावस्था विरोधी तत्व :

क्विनोआ हे जगातील सर्वात पौष्टिक खाद्य पदार्थांपैकी एक आहे. क्विनोआत एन्टी एजिंग म्हणजेच वृद्धावस्था विरोधी तत्व चांगल्या प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने त्याच्या नियमित सेवनाने तारुण्य टिकण्यासाठी तसेच त्वचा तुकतुकीत व तरुण राहण्यासाठी मदत होते. याशिवाय क्विनोआ जीवनसत्व ‘अ’ च्या पूरवठ्याचे एक प्रमुख साधन आहे, जे त्वचेला स्वस्थ व निरोगी बनविण्यासाठी उपयोगी पडते. याच्या सेवनामुळे चेह-यावरील सुरकुत्या व बारीक रेषांचे जाळे कमी होते.

चेह-यासाठी क्विनोआपासून फेस पैक तयार करता येतो. दोन कप सोयादुधात पाव कप क्विनोआ शिजवावा. दुध आटल्यावर थंड होऊ द्यावे. त्यात तीन चमचे दही, दोन अंड्याचा पांढरा भाग एकत्र करून पेस्ट तयार करावी. चेहरा व गळ्यावर व्यवस्थित लाऊन घ्यावी. २० मिनिटांनी थंड पाण्याने धुवावी.

 1. वेदना सूज:

क्विनोआमध्ये ब्युटरीट नावाचे फॅटी अॅसिड आणि सॅपोनीन नावाचे तत्व असते. त्यात दाहक विरोधी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे क्विनोआचा वापर आहारात केल्यास वेदना व सूज कमी होण्यास मदत होते.

 1. पचन संस्थेचे आरोग्य :

क्विनोआचा आहारात वापर केल्यास पचन संस्थेचे आरोग्य चांगले व मजबूत राहते. यात तंतुमय पदार्थ व जीवनसत्व ‘ब’ चांगल्या प्रमाणात उपलब्ध असल्या कारणाने अन्न पचनास मदत होते.

 1. चयापचय सुधारणे:

मानवी शरीरासाठी चयापचयाची क्रिया अत्यंत महत्वाची आहे खालेल्या अन्न पदार्थाचे उर्जेत रुपांतर करण्याचे काम ही क्रिया करत असते.  मंद चयापचय म्हणजे तुमच्या शरीराल उर्जेची कमी होणे होय. क्विनोआत प्रथिनांचे प्रमाण अधिक असल्या कारणाने चयापचयाची क्रियेत सुधारणा घडून येते.

 1. अशक्तपणा:

महिलांमध्ये रक्तक्षय मोठ्या प्रमाणात आढळून येतो जो कधी कधी गंभीर स्वरूप धारण करतो. या आजारात रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होते. रक्तातील लाल रक्तपेशीच्या वाढीसाठी लोहाची आवश्यकता असते. क्विनोआत भरपूर प्रमाणात लोह तत्व उपलब्ध असते. त्यामुळे क्विनोआचा आहारात समावेश केल्यास रक्तक्षय या समस्येपासून सुटका होण्यासाठी मदत होते. एक कप म्हणजेच  १८५ ग्रॅम शिजवलेल्या क्विनोआतून ३ मिली ग्रॅम लोहतत्व शरीराला प्राप्त होते. 

 1. कर्करोग :

क्विनोआच्या पानात अॅटीआक्सिडट व  कर्करोग विरोधी तत्व असतात. ज्याचा उपयोग कर्करोगासारख्या गंभीर आजारासाठी होतो. प्रोस्टेट कर्करोगावर हे अत्यंत गुणकारी आहे, तसेच यात चांगल्या प्रतीचे कर्बोदके व  प्रथिने यासारखी पोषण तत्व उपलब्ध असतात त्याच्या सेवनाने रुग्णाला उर्जा मिळते .

 1. निरोगी त्वचेसाठी :

त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी क्विनोआचा आहारातील वापर फायदेशीर ठरतो. क्विनोआतील  जीवनसत्व ‘ब’ हे परिपूर्ण असल्याने क्विनोआचा वापर आहारात केल्यास त्वचेवरील काळे किंवा पांढरे चट्टे कमी होतात. क्विनोआतील जीवनसत्व ‘ब-३ ’ मुळे चेह-यावर मुरूम व पुटकुळयाची वाढिस प्रतिबंध करते. क्विनोआतील तांबे व मॅगनीज तत्व हे एक उत्तम अॅटीआक्सिडटच्या स्वरुपात काम करत असल्याने त्वचा तुकतुकीत राहते.    

 1. हाडांच्या आरोग्य :

 क्विनोआमध्ये मॅंगनीज सारख्या आवश्यक खनिजे असतात, जे हाडे मजबूत करण्यासाठी कार्य करतात. क्विनोआ नियमित सेवन केल्यास हाडांशी संबंधित आजार जसे कि अस्थिमृदुता व अस्थिभंगापासून बचाव होतो.

 1. पेशी ऊतकांच्या विकासास मदत:

क्विनोआचे नियमित सेवन शरीरातील ऊतकांची दुरुस्ती आणि विकास करण्यास देखील मदत करते. क्विनोआमध्ये लायझिन नावाचा घटक असतो, जो ऊतकांची दुरुस्ती आणि विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. तसेच क्विनोआत मोठ्या प्रमाणात असणा-या प्रथिनांमुळे देखील उतकाचा विकास होतो

 1. केसांच्या आरोग्यासाठी:

 क्विनोआचे नियमित सेवन  केसांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. यात असणा-या हायड्रोलाईज प्रथिने केसांच्या रोमछीद्राला मजबूत करते. केसांच्या सौदर्य प्रसाधन निर्मितीसाठी या खास प्रथिनांचा वापर केला जातो. शिवाय क्विनोआतील  तांबे हे पोषणतत्त्व पण केसांच्या आरोग्यासाठी हितकारक आहे. याशिवाय यात असणारे अॅमिनो असिड केसांना निरोगी व  मजबूत ठेवण्यासाठी मदत करते.

 1. केसातील कोंडा कमी करणे:

क्विनोआमध्ये कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस या सारखे महत्वपूर्ण खनिजे असतात. ज्याचा उपयोग डोक्याची त्वचा स्वच्छ ठेवून कोंडाची समस्या दूर करण्यासाठी होतो. याव्यतिरिक्त क्विनोआमध्ये भरपूर प्रमाणात असणारे प्रथिने केसांना निरोगी ठेवण्यास देखील मदत करतात. आवश्यकतेनुसार क्विनोआ उकळून घेऊन त्यांची पेस्ट बनवावी.  आणि थंड झाल्यावर डोक्याची त्वचेला लावावी. १५-२० मिनिटांनंतर केस स्वच्छ पाण्याने धुउन घेतल्यास केसातील कोंडा कमी होतो. 

क्विनोआ लागवड

जगात क्विनोआ या पिकाची यशस्वी लागवड पाहता संयुक्त राष्ट्रांनी 2013 हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्विनोआ वर्ष जाहीर केले. दिवसेंदिवस या पिकाचे क्षेत्र वाढत असून या पिकास परदेशात चांगली मागणी आहे.  पेरू, बोलिव्हिया आणि ईकव्याडोर हे देश जगात लागवडीच्या दृष्टीने अग्रेसर असून या देशात हे पीक चांगल्या प्रकारे घेतले जाते. भारतात आंध्रप्रदेश, कर्नाटक, हरयाणा व उत्तरप्रदेश इत्यादी भागात या पिकाची लागवड केली जाते. या पिकास परदेशी बाजारपेठ उपलब्ध  असल्याने महाराष्ट्रात साधारणतः अहमदनगर, सांगली, परभणी व विदर्भातील काही शेतक-यानी या पिकाची लागवड केली.

जमीन:  या पिकांची लागवड करण्यासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, वाळूयुक्त पोयट्याची जमीन निवडावी. जमिनीचा सामू ६ ते ८.५ या तटस्थ स्थितीत असल्यास पिकाची उत्तमरित्या वाढ होऊन भरघोस उत्पन्न मिळते.

हवामान: हे पीक दुष्काळ सहन करणा-या पिकांच्या गटातील असून, कमी पावसाच्या प्रदेशात सुद्धा या पिकाची लागवड करतात. साधारणतः१८ ते २० डिग्री सेल्सिअस तापमानात या  पिकाची उत्तम  वाढ होते.

लागवडीचा हंगाम: या पिकाची लागवड मे (मध्यावर) ते जून महिन्यात करावी.

बियाण्यांचे प्रमाण: १५ ते २० किलोप्रति हेक्टरी बियाणे लागते.

लागवडीचे अंतर: दोन ओळींतील अंतर ३० सेंमी. ठेवावे.

खतव्यवस्थापन: या पिकास १२० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व ५० किलो पालाश देणे आवश्यक आहे. नत्रयुक्त खतेही २ वेळा विभागून द्यावे.

पाणी व्यवस्थापन: हे पीक पावसाच्या पाण्यावर येणारे असून पाण्याचा ताण सहन करणारे पीक आहे. ज्या ठिकाणी सर्वसाधारण पर्जन्यमान चांगले होते त्या ठिकाणी हे पीक उत्तमरित्या वाढते. पीक फुलोरा अवस्थेत असल्यास शक्य तो पाण्याचा ताण पडणार नाही याची काळजी घ्यावी.

तण नियंत्रण: पीक २५ ते ३० सेमी.  उंचीचे झाल्यास खुरपणी करून घ्यावी.

पीक काढणी कालावधी:  लागवडी नंतर ३ ते ४ महिन्यांनी पीक काढणीस येते.

उत्पादन: २० ते २५ क्विंटल प्रति हेक्टरी.

उत्पन्न: १२५ रुपये प्रति किलो.

 

लेखक - 

श्रीमती स्नेहलता भागवत,

विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान

कु. पुजा अनिल मुळे

वरिष्ठ संशोधन सहाय्यक,

कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा

Quinoa grain Quinoa grain लागवड Quinoa grain cultivate Quinoa grain useful for diabetes patient Obesity quinoa क्किनोआ क्किनोआ धान्य लागवड आरोग्यदायी क्किनोआ मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर क्किनोआ मधुमेह रुग्ण लठ्ठपणा
English Summary: Quinoa grain useful for obesity and diabetes patient

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.