1. आरोग्य सल्ला

Onion Juice Benefits : कांद्याचा रस केस आणि त्वचेसाठी आहे फायदेशीर

कांदा किती प्रमाणात गुणकारक आहे. याची कल्पना तुम्हाला आहे का? नसेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर. कांद्याचा रस त्वचा आणि डोक्याच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस निरोगी आणि मजबूत ठेवण्याव्यतिरिक्त केस वाढण्यास मदत करतो.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Onion juice  (Photo TOI)

Onion juice (Photo TOI)

कांदा किती प्रमाणात गुणकारक आहे. याची कल्पना तुम्हाला आहे का? नसेल तर हा लेख तुमच्यासाठी फायदेशीर. कांद्याचा रस त्वचा आणि डोक्याच्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे. कांद्याचा रस निरोगी आणि मजबूत ठेवण्याव्यतिरिक्त केस वाढण्यास मदत करतो. कांद्याचा रस त्वचेला लावला तर त्वचेवरील काळे डाग जाण्यास मदत होते. कांद्याचा रसामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि ई सारख्या अँटीऑक्सिडंट्स हे घटक असतात. हे निरोगी त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर आहे.

कांद्याचा रस त्वचा उजळण्यास आणि चेहऱ्यावरील निस्तेजपणा दूर करण्यास मदत करतो. यासाठी कांदा घ्या आणि त्याचा रस तयार करा. नंतर हा रस त्वचेवर लावा. सुमारे 20 मिनिटे तसेच ठेवा. हा रस तुम्ही नियमित वापरू शकता. हे आपल्या त्वचेवरील मुरुम आणि डाग काढून टाकण्यास मदत करते. तसेच त्वचेवरील बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.

हेही वाचा : कोरोनाच्या संकटकाळात कांदा प्रक्रिया उद्योगातून मिळवा उत्तम नफा

वाढत्या प्रदूषणामुळे आजकाल पिंपल्सची समस्या सामान्य झाली आहे. कांद्याच्या रसाच्या नियमित वापराने तुम्ही या समस्येपासून मुक्त होऊ शकता. कांद्याच्या रसात फ्लेव्होनॉईड्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. कांद्याचा रस काढा आणि त्यात एक चमचा ऑलिव्ह ऑईल घाला. हे मिश्रण मुरुमांवर लावा आणि 10 मिनिटे सोडा. त्यानंतर ते थंड पाण्याने स्वच्छ करा.

 

कांद्याचे तेल तयार करण्यासाठी प्रथम कांद्याचा रस घ्या. कांद्याचा रस काढण्यासाठी आपण ग्राइंडर वापरू शकता. सर्व प्रथम, पॅनमध्ये नारळ तेल घाला आणि या तेलात कांद्याचा रस घाला. चांगले मिसळल्यानंतर थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गाळणीने गाळून घ्या व वेगळ्या भांड्यात काढा. आपण हे तेल 6 महिन्यांसाठी वापरू शकता.

कांद्याचा रस त्वचेवरील घाण काढण्याचे काम करतो. आपण ते टोनर किंवा मास्क म्हणून देखील वापरू शकता. एक चमचा बेसन घ्यावे आणि त्यात एक चमचा कांद्याचा रस आणि अर्धा चमचा दुधाची मलई मिक्स करावी. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. यामुळे चेहरा तजेलदार दिसण्यास मदत होते.

English Summary: Onion juice is beneficial for hair and skin Published on: 05 August 2021, 06:37 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters