आपण विविध ऋतूंमध्ये विविध प्रकारच्या भाज्या खात असतो जे की आपल्या शरीरासाठी ते फायदेशीर असते आणि तेवढ्याच प्रमाणत त्यामधून आपणास पौष्टिक घटक भेटतात. आपणास या भाज्या अनेक प्रकारची मदत करतात. भाज्या आणि फळांपासून आपले वजन ही कमी होते तसेच शरीरामध्ये पाण्याची पातळी नियंत्रणात राहते त्यामुळे भाज्या आणि फळे खाणे आपणास फायदेशीर राहते. या भाज्यांपैकी एक भाजी ती म्हणजे वांगे. आपल्या आहारामध्ये वांग्याची भाजी असणे खूप फायदेशीर आहे. हिवाळ्याच्या दिवसात संध्याकाळी वांग्याच्या भाजीसोबत रोटी खाणे खूपच चांगले असते. वांग्याची फक्त चवच नाही तर ते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर मानले जाते.
वांग्याचे आरोग्य फायदे :-
१. वजन कमी करण्यास मदत होते :-
वांगे या फळभाजीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त प्रमाणात असते जे की यामुळे आपला जाडेपणा कमी होतो त्यामुळे आपल्या आहारामध्ये वांगे असणे आवश्यक आहे. वांग्यामध्ये फायबर असल्याने आपली पचनसंस्था सुद्धा चांगली राहते जे की आपले पोट साफ होते. वांग्याची भाजी खाल्याने आपले पोट जास्त वेळ भरल्यासारखे वाटते म्हणजे की लगेच भूक ही लागत नाही.
२. उच्च प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स :-
वांगे या फळभाजीमध्ये फक्त जीवनसत्त्वे च नसतात तर त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स चे प्रमाण देखील असते जे की आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसानीपासून आपले सरंक्षण करण्यास मदत करते. तुमच्या आहारात जर वांग्याचे प्रमाण असेल तर ते तुम्हाला कर्करोग तसेच हृदविकारापासून बचाव करेल व जे जुनाट आजार आहेत त्यांना नाहीसे करेल.
३. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते :-
तुमच्या आहारात जर वांग्याचा समावेश असेल तर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास मदत करते. वांग्यामध्ये फायबर हा घटक मोठ्या प्रमाणात असतो त्यामुळे ते आपल्या पोटासाठी फायदेशीर ठरते. जेवढ्या प्रमाणत तुम्ही फायबर खाणार तेवढ्या प्रमाणत रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहणार.
४. मेंदूचे आरोग्य राखण्यास मदत होते :-
वांग्यामध्ये फायटोन्यूट्रिएंट्स हा घटक असतो. जे की आपल्या शरीरात पेशी असतात त्या पेशींच्या पडद्यांचे ते सरंक्षण करतात. तसेच आपल्या मेंदूच्या मेमरी फंक्शनला फायटोन्यूट्रिएंट्स हा घटक प्रोत्साहन देतो. ब्रेन ट्युमर सारखी समस्या सुफध वांगे खाल्याने टळते.
५. अशक्तपणा प्रतिबंधित करते :-
आपण जो दैनंदिन आहार घेतो त्या आहारामध्ये मुबलक प्रमाणात लोह नसते त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. लोहाचे प्रमाण शरीरात कमी असल्याने आपणास ऍनिमिया सारखा आजार होतो तसेच आपणास थकवा, अशक्तपणा जाणवतो. मात्र वांगे जर आहारात असेल तर आपणास या सारख्या समस्यांना सामोरे जावे लागत नाही.
Share your comments