1. आरोग्य सल्ला

For Healthy Heart: हृदय निरोगी ठेवण्यासाठी ओमेगा 3 युक्त पदार्थ खा आणि हृदय ठणठणीत ठेवा

निरोगी राहण्यासाठी आणि प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. वाढत्या वयात शरीरात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता असते.अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आहारात या पोषक तत्वांनी समृद्ध आहाराचा समावेश केला पाहिजे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
omega 3 substance is so healthful for good health of heart

omega 3 substance is so healthful for good health of heart

 निरोगी राहण्यासाठी आणि प्रकारच्या पोषक तत्त्वांची आवश्यकता असते. वाढत्या वयात शरीरात कॅल्शियम, प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे आणि ओमेगा - 3 फॅटी ऍसिडची कमतरता असते.अशा स्थितीत तुम्ही तुमच्या आहारात या पोषक तत्वांनी समृद्ध आहाराचा समावेश केला पाहिजे.

 हृदयासाठी ओमेगा - 3 फॅटी ऍसिड तुमचे हृदय निरोगी आणि मजबूत बनवते.हे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. हाडे मजबूत करते. डोळे आणि केसांची संबंधित समस्या दूर करते. उमेगा शरीराला कर्करोगासारख्या आजारांपासून दूर ठेवते.

1) ओमेगा फॅटी ऍसिड चे फायदे :

 हृदयाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत होते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड मेटॅबोलिक सिंड्रोम बरा करते. ओमेगा 3 फॅटी ऍसिड वजन कमी करण्यास आणि लठ्ठपणा मध्ये देखील मदत करते.

 ओमेगा थ्री फॅटी ऍसिड तुमच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील आवश्यक आहे. त्वचा मऊ करण्यास, सुरकुत्या काढून टाकण्यास त्वचेचा ओलावा टिकून ठेवण्यास मदत करते.

 गर्भधारणेदरम्यान बाळाला आणि आईला आजारांपासून दूर ठेवण्यास मदत होते. याचे सेवन केल्याने मुलांच्या शरीराचा आणि मनाचा चांगला विकास होतो. ओमेगा फॅटी अॅसिड देखील डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.यामुळे डोळ्यांच्या रेटीनल आणि इतर अनेक समस्यांचा धोका कमी होतो.

 ओमेगा - 3 फॅटी अॅसिड उच्च रक्तदाब कमी करण्याचे काम करतात. ओमेगा 3 फॅटी ऍसिड मुळे कॅन्सर सारख्या धोकादायक आणि गंभीर आजारांपासून बचाव होतो. दमा आणि यकृत संबंधित समस्या दूर करते. ओमेगा 3 फॅटी

अॅसिडससह यकृत निरोगी

 ओमेगा 3 फॅटीअॅसिड देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आवश्यक आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड मानसिक आरोग्य राखण्यासाठी आणि मनोविकारांवरचे उपचार करण्यासाठी आवश्यक आहे.

2) ओमेगा 3 फॅटी ऍसिड या गोष्टीमध्ये आढळतात ( नैसर्गिक स्त्रोत )

1- अंबाडीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी ऍसिड मुबलक प्रमाणात असते.

2-सोयाबीन देखील ओमेगा-3 आणि ओमेगा - 6 चा चांगला नैसर्गिक स्त्रोत आहे.

3- प्रथिने आणि जीवनसत्त्वे असलेल्या अंड्यामध्ये ओमेगा-3 ऍसिड भरपूर प्रमाणात असते.

4- ओमेगा फेट्टी अॅसिडसही फुलकोबी मध्ये आढळते.

5- omega-3 फॅटी अॅसिडस साठी तुम्ही अक्रोड देखील खाऊ शकता.

6-ओमेगा 3 फॅटी अॅसिडस ब्ल्यूबेरी मध्येही आढळतात.

7-सॅल्मन मध्ये ओमेगा - 3 फॅटी अॅसिड मुबलक प्रमाणात असते.

8- ओमेगा -3 फॅटी अॅसिडस साठी तुम्ही तुमच्या आहारात राजमा आणि सोयाबीनचा ही समावेश करू शकता.

9- पालक आणि हिरव्या भाज्या सारख्या हिरव्या भाज्यांमधूनहि तुम्हाला ओमेगा 3 फॅटी अॅसिड मिळू शकते.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:या 'हेल्थ टिप्स' वापरा आणि डोकेदुखी पळवा

नक्की वाचा:'कृषी विवेक' या पुस्तकात यशोगाथा प्रकाशित झालेले कृषी यंत्राचा मांत्रिक म्हणजेच नामदेवराव!"

नक्की वाचा:Pawars Opinion:छोटे-मोठे कर्ज घेणाऱ्यांनी व्याजासह ते कर्ज वेळेत परत केले तरच सहकार क्षेत्राला येईल बळकटी

English Summary: omega 3 substance is so healthful for good health of heart Published on: 16 May 2022, 04:32 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters