1. आरोग्य सल्ला

Health Tips: सुदृढ आणि निरोगी शरीरासाठी 'असा'असावा आहार,आरोग्य राहिल ठणठणीत

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nutritional diet for good health

nutritional diet for good health

आपल्याला माहित आहेच कि चांगल्या आरोग्यासाठी आणि शरीर सुदृढ आणि निरोगी राहण्यासाठी आपला दैनंदिन आहार खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतो. आहारावरच आपल्या शरीराचा डोलारा उभा आहे. परंतु जर आपण सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर कामाचा ताण,दगदग आणि धावपळ यामुळे बाहेरच्या खाण्यावर जास्त करून भर देताना खासकरून तरुणाई दिसत आहे.

त्यामुळे शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या निर्माण होतात. आपण या लेखामध्ये शरीराला पोषक आहार नेमका कसा असावा याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Health Knowledge: 'चिया सीड्स' आरोग्याचा आहे खजिना,वाचा याचे फायदे

 शरीराला आवश्यक पोषक आहार

1- यामध्ये सगळ्यात अगोदर महत्त्वाची बाब म्हणजे आपण जेवण बनवताना काही पद्धत अवलंबतो त्यामध्ये काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. उदाहरणच घ्यायचे झाले तर तांदूळ व डाळ सारखे पदार्थ जास्त प्रमाणात पाण्यात धुऊ नयेत. जर असे केले तर त्यामुळे पाण्यात विरघळणारे जे काही पौष्टिक घटक असतात ते निघून जातात.

यामध्ये दुसरे उदाहरण देता येईल ते म्हणजे आपण भात शिजवतो तेव्हा त्याचे पाणी काढून टाकू नये. अशा गोष्टी केल्याने अन्नपदार्थातील पौष्टिक मूल्य कमी होतात. बऱ्याच जण भाजी कापून मग पाण्यात धुतात. परंतु असे केले तर पाण्यात विरघळणारे जे काही जीवनसत्व भाजीपाल्यामध्ये असतात ते पाण्यात निघून जातात. त्यामुळे अगोदर या गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:Calcium Food: हाडांना भरपूर कॅल्शियम देणारे हे पदार्थ दररोज खा; हाडं होतील मजबूत

2- आहारामध्ये भाकरीचा समावेश करणे खूप गरजेचे आहे. यामध्ये तुम्ही ज्वारी किंवा बाजरीची तसेच नाचणीची भाकरीचा समावेश करू शकता.

3-जेव्हा आपण जेवतो तेव्हा दोन वेळच्या जेवणात किंवा एक वेळा तरी एक वाटी वरण असणे खूप गरजेचे आहे.

4- दुपारच्या जेवणामध्ये भाकरी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्यांचा समावेश करणे गरजेचे आहे. यासोबत कोथिंबीर, दही किंवा ताक, उसळ सारखे पदार्थ असावेत.

5- शरीराची प्रथिने व कॅल्शियमची गरज भागवण्यासाठी आहारामध्ये दूध,दही व ताक तसेच पनीर सारख्या पदार्थांचा समावेश करणे गरजेचे आहे.

6- बरेचदा आपण बाजारामध्ये मिळणाऱ्या चटण्या किंवा सॉसचा आहारात वापर करतो. याऐवजी जर तुम्ही घरी चटणी किंवा सॉस बनवून त्याचा वापर केला तर त्यामुळे मिठाचे प्रमाण देखील नियंत्रणात राहते.

7- ऋतूनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या व फळे मिळतात. अशा ऋतुमानानुसार मिळणार या भाज्यांचा व फळांचा आहारात वापर करावा.

8-दैनंदिन आहारामध्ये आंबट, तिखट, गोडअशा विविध चवयुक्त पदार्थांचा समावेश असावा.

नक्की वाचा:Health Mantra: 'हे'घरगुती उपाय ठरतील आंबट ढेकर येण्यावर रामबाण उपाय, वाचा सविस्तर माहिती

English Summary: nutritional diet is so important for fitness and fit and fine health Published on: 20 September 2022, 04:37 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters