आता तुम्ही मेडिकल स्टोअर्समधून किंवा ऑनलाईन औषध खरेदी करत असाल तर ते खरे आहे की बनावट हे ओळखणे खूप सोपे होईल.
औषधे बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सक्रिय फार्मास्युटिकल घटकांवर(एपीआय) क्यू आर कोड टाकणे सरकारने बंधनकारक केले होते. या अंतर्गत, औषध मूल्यनिर्धारण प्राधिकरण (DPA- औषध नियामक प्राधिकरण) ने 300 औषधांवर QR कोड टाकण्याची तयारी केली आहे.
या पाउलामुळे औषधांच्या विक्रीत आणि किमतीत पारदर्शकता येईल, असा विश्वास आहे. यासोबतच काळा बाजारालाही आळा बसणार आहे. या यादीमध्ये वेदना आराम, जीवनसत्व पूरक आहार, रक्तदाब, साखर आणि गर्भनिरोधक औषधांचा समावेश आहे.
मीडिया रिपोर्टर्सनुसार, नॅशनल फार्मास्युटिकल प्राईसिंग ऑथॉरीटीने डोलो, सॅरीडॉन,फॅबिफ्लू, इकोस्प्रिन,लिम्सी, सुमो, कॅल्पोल, कोरेक्स, सारख्या मोठ्या ब्रँडला मान्यता दिली आहे. कोरेक्स सिरप अनवांटेड 72 आणि थायरोनॉर्म सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश करण्यात आला आहे.
ही सर्व औषधे खूप लोकप्रिय आहेत आणि ताप, डोकेदुखी, विषाणूजन्य, विटामिनची कमतरता,खोकला,थायरॉईड आणि गर्भनिरोधक कांसाठी दिली जातात.
बाजार संशोधनानुसार त्यांच्या वर्षभरातील उलाढालीच्या आधारावर व औषधांची निवड करण्यात आली आहे. या औषधांची यादी आरोग्य मंत्रालयाला पाठवण्यात आली आहे. जेणेकरून त्यांना QR कोड अंतर्गत आणण्यासाठी आवश्यक बदल करता येतील.
नक्की वाचा:Health Alert: 'ही'लक्षणे दिसताच ओळखा हृदयविकाराचा धोका,वाचण्यासाठी करा या गोष्टी
Share your comments