1. आरोग्य सल्ला

हाडांच्या मजबुतीसाठी मशरुम आहे उपयोगी

मशरूम खाणे हे तसे आता नवीन राहिलेली नाही. आताच्या युगात मशरूमचा वापर खाद्य म्हणून मोठ्या मोठ्या हॉटेल्स, रेस्टॉरंट यापुरताच मर्यादित नसून मोठ्या शहरांमध्ये एक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून मशरूमकडे पाहिले जाते.

KJ Staff
KJ Staff


मशरूम खाणे हे तसे आता नवीन राहिलेली नाही. आताच्या युगात मशरूमचा वापर खाद्य म्हणून मोठ्या मोठ्या हॉटेल्स,  रेस्टॉरंट यापुरताच मर्यादित नसून मोठ्या शहरांमध्ये एक आरोग्यासाठी फायदेशीर म्हणून मशरूमकडे पाहिले जाते.  मशरूम आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहे, मशरूममध्ये मोठ्या प्रमाणात अँटिऑक्सिडंट असते, त्यामुळे वय वाढण्याची गती असते ती कमी होते.  सुख किंवा भाजी अशा कोणत्याही स्वरूपामध्ये मशरूम खाता येते.

 मशरूमचे खालीलप्रमाणे फायदे असतात

  • हाडांच्या मजबुतीसाठी विटामिन डी ची आवश्यकता असते. मशरूममध्ये व्हिटॅमिन डी' बऱ्या प्रमाणात असते त्यामुळे शरीरातील 20% व्हिटॅमिन डी'ची कमतरता मशरूम खाण्यामुळे भरून निघते.
  • मशरूम खाण्यामुळे वजन आणि ब्लड शुगर वाढत नाही. कारण मशरूममध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात.
  • मशरूम खाण्याने व्यक्ती कायम उत्साही दिसतो. म्हणून नियमित तरुण आणि उत्साही राहण्यासाठी मशरूम खाणे फायद्याचे असते.
  • मशरूम खाण्याने कॅन्सरपासून बचाव होऊ शकतो, तसेच मशरूममध्ये केस आणि त्वचेसाठी फायदेशीर असे घटक असतात.
  • मशरूममध्ये जास्त प्रथिने व ऊर्जा कमी असते. त्याचा फायदा हा मधुमेही व्यक्तींना होतो. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्याचे घटक मशरूम मध्ये असतात.
  • मूत्रपिंड रोग यांचा जीवनकाळ वाढविण्यास मशरूम उपयुक्त ठरते.
  • मशरूममध्ये क जीवनसत्व असल्यामुळे स्कर्व्ही रोगापासून बचाव होतो.
  • मशरूमचा उपयोग हा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यासाठी होतो.  कारण मशरूममध्ये तंतुमय पदार्थ व फॉलिक ऍसिड हे घटक मोठ्या प्रमाणात असतात.

English Summary: Mushrooms are useful for strengthening bones Published on: 30 August 2020, 02:05 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters