भारतात प्रामुख्याने मूग हे कडधान्य सर्वच खाद्यपदार्थांमध्ये वापरले जाते. तसे आपल्या आरोग्यासाठी सर्वच कडधान्य महत्वाची मानली जातात मात्र त्यातल्या त्यात मुगाच्या डाळीचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरले जाते. मुगडाळ मध्ये ‘अ’, ‘ब’, ‘सी’ आणि ‘ई’ हे प्रमुख जीवनसत्त्वे असतात जे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक ठरतात. मूग डाळीमध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेट, फायबर, व्हिटॅमिन बी9, मॅग्नेशियम, मॅंगनीज, व्हिटॅमिन बी4, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त, लोह, व्हिटॅमिन बी2, बी3, बी5, बी6 हे आढळतात जे की मुग डाळ म्हणजे प्रोटिनसाठी सर्वात महत्वाचा घटक मानला जातो.
मूग डाळीचे फायदे :-
१. मुग डाळ पोटासाठी फायदेशीर :-
मुग डाळीमध्ये फायबर नावाचा घटक असतो जो आपल्या पोटाला निरोगी ठेवण्याचे काम करतो तसेच त्यामध्ये असलेले जे कार्ब आहेत ते देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. आपले पोट साफ होत नसेल किंवा अपचन होत असेल तर मुग डाळीचे सेवन करावे जेणे की आपले पोट साफ होईल.
२. आजारांपासून करते सरंक्षण :-
मुग डाळीमध्ये विविध प्रकारचे अँटीऑक्सिडेंट असतात जे आपल्या शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून दूर ठेवतात वाचवतात. मुक्त रॅडिकल्स हे शरीरातील कर्करोग तसेच जळजळ, हृदयविकार या समस्यांना जास्त प्रमाणात कारणीभूत ठरतात.
३. वजन कमी करण्यास फायदेशीर :-
मुग डाळीचे सेवन आपल्या आहारात असेल तर ते आपला जाडेपणा कमी करणे म्हणजे वजन नियंत्रणात आणण्यास मदत करते. मुग डाळीमध्ये जास्त प्रमाणात फायबर तसेच प्रथिने असतात त्यामुळे आपल्या भुकेचे हार्मोन्स सक्रिय करत नाहीत त्यामुळे आपल्याला भूक ही लागत नाही.
४. हृदय चांगले राहते :-
एका संशोधनानुसार मुग डाळ आपले कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत करते जे की यामुळे आपल्या हृदयाला समस्या पोहचत नाहीत त्यामुळे तुम्ही नियमितपणे मुगाच्या डाळीचे सेवन करणे गरजेचे आहे.
अशा प्रकारे खा मुग डाळ :-
सकाळी लवकर तुम्ही अंकुरलेली मुग डाळ खाल्ली की आपल्या शरीरातील कमजोरी दूर होते आणि ऊर्जा येते. कारण मुग डाळीमध्ये प्रथिने, अमीनो अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट हे घटक असतात जे आपल्या शरीराला गंभीर आजारांपासून दूर ठेवतात.
Share your comments