किवीचे आहेत अनेक फायदे; एका पेक्षा जास्त जीवनसत्त्वे आहेत एकाच फळात

16 March 2021 12:13 PM By: KJ Maharashtra
बहु उपयोगी किवी फळ

बहु उपयोगी किवी फळ

किवी फळांचा आतील भाग हिरवा तर काहींचा पिवळ्या रंगाचा असतो. गरामध्ये काळ्या रंगाच्या छोट्या खाण्यायोग्य बिया असतात. केक, मिठाई तसेच शीतपेये यांच्या सजावटीसाठी या फळाचा वापर केला जातो.या फळाच्या अनेक प्रजाती आहेत. काही प्रजातीतील फळांचा आतील भाग हिरवा तर काहींचा पिवळ्या रंगाचा असतो. गरामध्ये काळ्या रंगाच्या छोट्या खाण्यायोग्य बिया असतात. त्यामुळे हे फळ आकर्षक दिसते. केक, मिठाई तसेच शीतपेये यांच्या सजावटीसाठी या फळाचा वापर केला जातो.

किवी फळ  किमतीने महाग असले तरी या फळाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हे फळ साल काढून किंवा सालीसहीत खाता येते. सालीसहीत खाल्ल्यास चवीला थोडे वेगळे लागते. मात्र, या फळाच्या सालीमध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. त्यामधील अँटिऑक्सिडंट आरोग्याला फायदेशीर असतात. किवी फळामध्ये जीवनसत्त्व क मुबलक प्रमाणात असते. तसेच किवीमध्ये अ, इ, के ही जीवनसत्त्वे आणि फोलेट्स असतात. सोडिअम, पोटॅशिअम, क्लोराईड हे क्षार, तसेच मॅग्नेशियम, लोह, मॅंगनीज, फॉस्फरस ही खनिजे काही प्रमाणात असतात.

हेही वाचा : आपल्या त्वचेसाठी कडुलिंबाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत

किवी जॅम

प्रथम परिपक्व किवी फळे निवडून घ्यावीत. फळे स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. धुतलेली फळे मिक्सरमधून काढून त्याचा गर वेगळा करावा. जॅम बनवण्यासाठी  गराच्या वजनाएवढी साखर मिसळावी. प्रति किलो जॅम बनविण्याकरिता १.५ ग्रॅम सायट्रिक आम्ल मिसळून मिश्रण चांगले एकजीव करावे. मंद आचेवर मिश्रण ठेवून सतत ढवळत राहावे. मिश्रणाचा ब्रिक्‍स ६८.५ इतका झाल्यावर उष्णता देणे बंद करावे. तयार जॅम निर्जंतुक केलेल्या काचेच्या बाटल्यांमध्ये भरावा. बाटल्यांची साठवणूक थंड व कोरड्या जागी करावी.

 

आरोग्य दायक फायदे

जीवनसत्त्व-क मुबलक प्रमाणात असते. जे लिंबू आणि संत्र्याच्या तुलनेत दुप्पट असते. जीवनसत्त्व ब-६ गर्भवती महिलांना आणि गर्भाला स्वस्थ ठेवण्यास ब-६ मदत करते.मधुमेहींसाठी किवी फळ गुणकारी मानले जाते. ग्लायसेनीक इंडेक्समध्ये किवी सर्वांत खालच्या स्थानावर आहे. हे फळ खाण्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढत नाही. कोलेस्टेरॉलच्या रुग्णांसाठी किवी फळ उपयुक्त ठरते. किवीमधील जीवनसत्त्व-क मध्ये रक्त पातळ करण्याचे गुणधर्म असतात.

किवी रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. या फळाच्या सेवनामुळे रक्तातील प्लेटलेटस् वाढतात.किवीच्या सेवनामुळे लोह या खनिजाचे शोषण वाढते. त्यामुळे रक्तक्षयापासून संरक्षण मिळण्यास मदत होते.

 

ह्रदयाच्या आरोग्य राखण्यासाठी किवीचे सेवन फायदेशीर ठरते. जीवनसत्त्व क, इ  आणि पॉलीफेनोल्स ह्रदय आणि रक्तवाहिन्यांशी निगडित संरक्षण प्रदान करतात.तंतुमय पदार्थांचा उत्तम स्रोत म्हणून किवी फळ ओळखले जाते. किवीमधील जीवनसत्त्व इ आणि अँटीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात.

kivi fruit vitamins किवी किवी फळ
English Summary: More vitamins in kivi fruit

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.