दुध हे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. दूध प्यायल्याने आरोग्यदायी खूपच फायदा होतात. दूध पिणे हे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच फायदेशीर आहे.
शरीरातील बऱ्याचशा पोषक घटकांची कमतरता भरून काढण्याचे काम दूध पूर्ण करते. आपण दूध पितो रात्री झोपायच्या अगोदर किंवा सकाळी अशा दोन वेळ त्यासाठी बहुतांशी वापरले जातात. तसे पाहायला गेले तर दूध कोणत्या वेळेत पिणे योग्य आहे याबद्दल बोलताना बरेच लोक म्हणतात की सकाळी दूध पिणे आरोग्यासाठी चांगले आहे. परंतु याबाबत काही लोकांचे मत आहे की रात्री दुधाचे सेवन करणे अधिक योग्य आहे. म्हणून या पार्श्वभूमीवर आपण या लेखामध्ये या प्रश्नाचे योग्य उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू. दूध पिण्याची योग्य वेळ कोणती आहे तसेच आपण कोणत्या वेळी दूध प्यावे? आणि आपल्या शरीराला दुधाची कसे फायदे होतात? हे या लेखात जाणून घेऊ.
दूध पिण्याचे फायदे
दुधाला संपूर्ण अन्न असे म्हटले जाते.भारतीय आहारामध्ये दुधाचा वापर जास्त प्रमाणात केला जातो. बऱ्याचदा दुधाचा आहारात वापर हा आहे त्या स्वरूपात केला जातो किंवा त्यातून बरेच प्रकारचे प्रक्रियायुक्त उत्पादने तयार केली जातात व त्यांचा आहारात वापर केला जातो. दुधापासून कॅल्शियम मिळते. परंतु कॅल्शियमचा नाही तर प्रथिने, जीवनसत्वे, जीवनसत्त्व ए, बी 1, बी 2 आणि बी 12 आणि जीवनसत्व दिली तसेच मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखे आणि पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराला याचा खूप फायदा होतो.
दूध पिण्याची योग्य वेळ कोणती?
याबाबतीत आयुर्वेदाचा विचार केला तर आयुर्वेद सांगतो की दूध पिण्याची योग्य वेळ रात्र हे असून रात्री झोपण्यापूर्वी एखादा ग्लास दूध प्यावे. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या ऍलर्जी होत नसल्या कारणाने सर्व लोकांनी दूध पिणे गरजेचे आहे. जर तुम्ही रात्री झोपण्याच्या अगोदर दूध सेवन कराल तर तुम्हाला चांगली झोप देखील मिळेल आणि पाचन आणि पौष्टिक गुणधर्मासाठी दुधाचे आयुर्वेदात विशेष स्थान आहे. जेव्हा आपण रात्री दूध पितो तेव्हा तुम्हाला कॅल्शिअमचे अधिक फायदे मिळतात कारण रात्रीच्या वेळी तुमची क्रिया पातळी कमी असते. त्यादृष्टीने सकाळच्या वेळी दृष्टीनेदेखील फायदेशीरच आहे. बऱ्याच लोकांना ॲसिडिटीचा त्रास असतो अशा लोकांना रात्री दूध पिणे तसे अवघड आहे. लहान मुलांनी दिवसा दूध पीने त्यांच्या आरोग्यासाठी खूपच चांगले आहे परंतु रात्री दूध पिणे जास्त योग्य मानले जाते. त्यामुळे दुधाचे सेवन जास्त करून रात्री करावे.
(टीप- वरील माहिती विविध स्त्रोतांकडून घेतली असून वाचकांसाठी माहितीस्तव सादर केली आहे. या माहितीशी व्यक्तिगत वा कृषी जागरण समूह सहमत असेलच असे नाही)
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:केसामध्ये कोंडा झाला आहे? या घरगुती उपायांनी चुटकीसरशी पळेल केसातील कोंडा
नक्की वाचा:भाऊ उन्हाळा चालू आहे! कलिंगड खायला आवडते का? जरूर खा पण जरा सांभाळून
Share your comments