प्लास्टिकचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप जास्त प्रमाणात करतो. प्लास्टिक आता आपल्या रक्तामध्ये सुद्धा एक भाग होऊन बसले आहे. वाचूनच धक्का बसेल असा हा प्रकार आहे.
त्यामुळे सावधान होणे खूप गरजेचे आहे. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, नेदरलँड मधील युनिव्हर्सिटी ऑफ ॲम्स्टरडॅम ने आपल्या संशोधनामध्ये पहिल्यांदा संशोधन करून निष्कर्ष काढला की 80 टक्के लोकांच्या रक्तात प्लास्टिकचे कण समाविष्ट आहेत. नेमकी काय आहे हे संशोधन याची माहिती घेऊ.
संशोधनामध्ये काय आढळून आले?
मागे काही दिवसांपूर्वी युनिव्हर्सिटी ऑफ ऍमस्टरडॅम च्या मेडिकल सेंटरमध्ये एक संशोधन केले गेले. यामध्ये 22 स्वस्थ लोकांचा रक्ताचा नमुना घेतला गेला. त्यानंतर तपासणी केल्यानंतर दिसून आले की या मधील सतरा ब्लड डोनर च्या शरीरामध्ये मायक्रो प्लास्टिक अस्तित्वात आहे. याबाबतीतले संशोधन करणारे प्रोफेसर डिक वेथाक यांनी सांगितले की, त्यांनी व त्यांच्या टीमने बावीस लोकांच्या रक्तामध्ये 700 नॅनोमीटर पेक्षा मोठे सिंथेटिक पोलिमर सापडले आहे. तसेच या 17 लोकांच्या रक्तामध्ये पॉली इथिलिन टेरेफ्थलेट आणि स्टायरीन पोलिमर पासून बनलेले मायक्रो प्लास्टिक सापडले आहे. हे पहिल्यांदा घडले आहे की मनुष्याच्या रक्तामध्ये प्लास्टिक असण्याची माहिती पडले आहे. आता प्रश्न पडतो की आपल्या शरीरामध्ये प्लास्टिक आहे तर गेले कसे?
मायक्रो प्लास्टिक आपल्या रक्तात कसे जाऊ शकते?
संशोधकांचे म्हणणे आहे की हे प्लास्टिकचे शरीरामध्ये खाण्यापिण्याचे सामान तसेच जेव्हा आपण श्वास घेतो या माध्यमातून शरीरात जाऊ शकतात. हे प्लास्टिक चे छोटे छोटे कण हवेमध्ये तरंगतात आणि बऱ्याचदा पावसाच्या पाण्याच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यात देखील मिसळले जातात. तसेच आपण मिनरल वॉटर पितो तर त्या प्लास्टिकच्या बाटली च्या माध्यमातून किंवा प्लास्टिकच्या पॅकेटमध्ये पॅक केलेली वस्तू देखील आपण खातो या माध्यमातून देखील मायक्रो प्लास्टिक आपल्या शरीरात जाऊन आपल्या हार्ट पर्यंत पोहोचू शकते. तसेच आपण दररोज सकाळी ब्रश करतो. या ब्रशच्या माध्यमातून देखील प्लास्टिकचा प्रवेश शरीरात होऊ शकतो. हीच महत्त्वाची कारणे आहेत की तपासणी च्या दरम्यान प्रत्येक मिली लिटर रक्तामध्ये 1.6 मायक्रो ग्राम प्लास्टिक मिळाले आहे. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेमध्ये हसणारे प्लास्टिक श्वासाद्वारे आपल्या शरीरात जाऊन हृदयापर्यंत पोहोचू शकतात. त्या माध्यमातून आपल्या फुफ्फुसांमध्ये हे कण अडकल्याने बऱ्याचदा तिथून रक्तात मिसळले जाते.
आपल्या शरीराला काय होऊ शकते नुकसान?
1- याबद्दल डॉक्टर दिवेश गोयल यांच्या म्हणण्यानुसार, प्लास्टिक बनविताना बिस्फेनोल ए रसायनाचा वापर केला जातो. जे मायक्रो प्लास्टिक मध्ये असते. यामुळे भविष्यात कॅन्सर होण्याची शक्यता वाढते.
2- तसेच रक्तामध्ये मायक्रो प्लास्टिकचे कन असल्याने ब्लडप्रेशर वाढू शकतो.
3- तसेच मायक्रो प्लास्टिक मुळे यकृत आणि किडनी लाही नुकसान होऊ शकते.
प्लास्टिक नेमके काय आहे? केव्हा बनले?
1- मानले जाते की कोळसा आणि तेलापासून प्लास्टिक तयार केले जाते. बऱ्याच प्रमाणात हे एक सत्य देखील आहे
2- आज पासून शंभर वर्ष पूर्वी बेल्जियम वंशाचे शास्त्रज्ञ लिओ बॅकलैंड यांनी फिनोईल आणि फार्म्लॉडीहाईड नावाच्या दोन रसायनांना एकमेकांमध्ये मिसळून एक पदार्थ बनवला ज्याचे नाव बेकेलाइट असं ठेवले गेले. यालाच सर्वप्रथम प्लास्टिकअथवा सिंथेटिक प्लास्टिक असे म्हणतात.
3- प्लास्टिक ची सर्वात मोठी समस्या म्हणजे ते बायोडिग्रेडेबल नसते. कितीही दिवस जमिनीमध्ये असेच राहू शकते ते कुजत नाही. शेकडो वर्षांपर्यंत ते पर्यावरणामध्ये राहू शकते.
4- केंद्र सरकारने प्लास्टिक वापरायची सवय जी वाढत आहे आणि त्याचे वाईट परिणाम यामुळे दोन ऑक्टोंबर दोन हजार एकोणवीस पासून संपूर्ण देशात सिंगल युज प्लास्टिक वापरण्यावर प्रतिबंध लावला आहे.
Share your comments