झेंडूचे फुले आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. दसरा, दिवाळीसारख्या सणांमध्ये या फुलांना विशेषतः प्रचंड मागणी असते. तसेच अनेक ठिकाणी पूजा मध्येदेखील झेंडूच्या फुलांचा वापर केला जातो. परंतु यात झेंडूच्या फुलांची एक खास वैशिष्ट्य म्हणजे या फुलांपासून एक चहा देखील बनवता येतो.
ऐकून आश्चर्य वाटेल अशीच ही गोष्ट आहे. या लेखात आपण झेंडूच्या फुलांचा पासून चहा कसा बनवतात आणि त्या चहाची आरोग्याला होणारे फायदे याविषयी माहिती घेणार आहोत.
झेंडूच्या चहा आरोग्यासाठी आहे फायदेशीर
जर आपण झेंडूच्या फुलांचा वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यांचा केला तर त्यांच्यामध्ये अँटिऑक्सिडंट गुण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे मानसिक ताण तणाव कमी होण्यास खूप मदत होते. काही कारणामुळे अंगावर येणारी सूज, शरीरातील अतिरिक्त चरबी आणि मधुमेह चहा प्यायला मुळे कमी केले जाऊ शकतात.
तसेच काहींना दात दुखी चे समस्या असते. झेंडूच्या फुलांची चहा प्यायला मुळे दात दुखी चे समस्या दूर होते. खासकरून दात दुखी बंद करण्यासाठी झेंडूच्या करून थोडासा थंड त्यानंतर त्याने गुळण्या कराव्यात. तशाच काहींना त्वचेसंबंधी समस्या असतील तरझेंडू च्या फुलांचा चहा मुळे कमी होतात.चेहऱ्यावर असणारी मुरूमआणि तारुण्यपिटिका येण्याच्या समस्यांपासून सुटका होते.
झेंडूच्या फुलांची चहा तयार करण्याची पद्धत
हा चहा तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर दोन ग्लास पातेल्यात पाणी घ्यावे. आता ते पातेले गॅसवर ठेवावे. पाणी उकळायला लागल्यावर त्यामध्ये झेंडूच्या फुलांच्या पाकळ्या टाकाव्यात.
नंतर त्या पातेल्यावर पाच मिनिटांसाठी झाकण ठेवावे.झाकण ठेवल्यानंतर थोडा गॅस कमी करावा व पाणी चांगले उकळू द्यावे. या प्रक्रियेमध्ये झेंडूच्या फुलांच्या रंग पाण्यामध्ये उतरलेला दिसेल.हे पाणी अर्धे होईपर्यंत उकळत राहावे. नंतर या पाण्यामध्ये मध मिसळावे. अशाप्रकारे झेंडूच्या फुलांचा चहा तयार करून तुम्ही तो पिऊ शकता.
Share your comments