देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे, दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी अद्याप कोणतीच लस उपलब्ध झालेली नाही, यामुळे आपल्याला कोरोनाविरुद्धात लढण्यासाठी सशक्त आरोग्याची गरज आहे. कोरोनाला मात देण्यासाठी आपल्या शरिरात रोगप्रतिकारकशक्ती अधिक असणे गरजेचे आहे. डॉक्टरी आपल्याला रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचा सल्ला देत आहेत.
यासाठी जे पदार्थ , फळे , रोगप्रतिकारकशक्ती वाढवतील त्यांचे सेवन आपण केले पाहिजे. दरम्यान FSSAI ( फूड सेफ्टी एंड स्टॅडर्ड ऑथोरिटी ऑफ इंडिया ) ने दावा केला आहे की, व्हिटॉमीन सी असलेले पदार्थ, फळे आपली इम्यूनिटी पॉवर वाढवण्यास लाभकारक ठरतील. यामुळे व्हिटॉमीन - सी ने परिपूर्ण असलेली एक पदार्थ आपल्या रोजच्या जेवणात समाविष्ट करावा. हे कोणकोणते फळे आहेत याची माहिती आपण घेणार आहोत.
आवळा - 'कंटेम्परेरी क्लिनिकल ट्रायल्स कॉम्यूनिकेशन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार, आवळामध्ये रक्तभिसरण व्यवस्थित ठेवण्यासाठी आणि ऑक्सीडेटिव्ह स्ट्रेसच्या बायोमार्करला कमी करण्यासाठी उपयोगी आहे. आवळा व्हिटॉमीन सी साठी एक चांगला स्रोत आहे. यासह शरिरासाठी आवश्यक असलेले लोह, प्रथिने, फायबर, साठी आवळा उत्तम स्रोत आहे. आवळा रोज खाल्याने आपली इम्यूनिटी सिस्टिम मजबूत होते.
संत्रा - यात अनेक प्रकारचे पोषक तत्व असतात, सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात कॅलोरिज खूप कमी असते. यामुळे कॉलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका नसतो. संत्रा खाल्याने आपल्याला डायटरी फायबर मिळते, जे आपल्या शरिराला हानीकारक असलेल्या तत्वांना बाहेर काढण्याचे काम करते. संत्रा डायजेस्टिव सिस्टम म्हणजे पचनसंस्थेसाठी एका टॉनिक प्रमाणे (औषधाप्रमाणे ) काम करते, आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
पपई - पपई पण संत्राप्रमाणे कमी कॅलरी आणि फायबरसाठी चांगला स्रोत आहे. पपई पण शरिराच्या डिटॉक्सीफाय केल्यानंतर पचन क्रिया व्यवस्थित करते. यासह रोगप्रतिकारकशक्तीही वाढविण्यात पपई मोठी फायदेकारक आहे.
निंबू - वजन कमी करण्यापासून ते हृदयरोगासारख्या गंभीर विकारांपासून वाचविण्यासाठी निंबू हे संजीवनी सारखे काम करते. यात असणारे सिट्रिक अॅसिड मुतखडाच्या उपचारासाठी खूप गुणकारी आहे. हे शरिराच्या युरिन वॉल्यूम आणि पीएच पातळी वाढविण्याचे काम करते. इम्यूनिटीची क्षमता वाढविण्यासाठी निंबू आपल्या भोजनात समाविष्ट करावा.
पेरू - फायबर आणि पोटॉशिअमसाठी पेरू उत्तम आहे. पेरु हे रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी खूप उपयोगी आहे. यासह हे हृदय रोगालाही आपल्यापासून दूर ठेवते. पेरू व्हिटॉमीन- के आणि व्हिटॉमीन - अ साठी चांगला स्रोत आहे.
ऑरेंज आणि ग्रेफफ्रूट -
ऑरेंज और ग्रेपफ्रूट - संत्रा आणि ग्रेपफ्रूटचा ज्यूस सिस्टमला बूस्ट करण्यासाठी खूप लाभदायक आहे. विटामीन सी भरपूर असल्याने हे ज्यूस त्वेचेत उजळपणा आणते.
टरबूज ज्यूस - टरबूजमध्ये व्हिटॉमीन अ, व्हिटॉमीन सी मॅग्नीशिअम आणि जिंक सारख्या पोषक तत्वे आढळतात. हे इम्युनिटी सिस्टीमला वाढविण्याचे काम करत असतात.
गाजर आणि अद्रकपासून बनविण्यात आलेले ज्यूस इम्यूनिटी सिस्टीमला मजबूत करत असते. या दोन्ही फळांचा एकत्र ज्यूस केल्यास व्हिटॉमीन अ, व्हिटॉमीन सी, व्हिटॉमीन -ई सह लोह आणि कॅल्शिअम सारखे खनिजे आपल्याला मिळत असतात.
Share your comments