1. आरोग्य

लिंबूमध्ये आहे 'जादूई' गुणधर्माचे भांडार; प्रजनन क्षमतेसाठी आहे फायद्यांचे

KJ Staff
KJ Staff

 

लिंबू हे एक फळ आहे जे सर्वांना परिचित आहे. हे उत्तम खाद्य फळ आहे जे अनेक औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. भारतात काही दक्षिण राज्यात लिंबू त्यांच्या  स्वयंपाकघरातील एक अनिवार्य फळ आहे. भारत, श्रीलंका आणि थायलंडसारख्या देशांमध्ये लिंबूचा वापर अधिक आहे.  युनायटेड स्टेट्स, फ्लोरिडा, कॅलिफोर्निया आणि इटलीसारख्या देशांमध्ये उष्ण हवामानात देखील वाढते.

लेमन चहा, लेमन  तांदूळ आणि लिंबाचा ज्युस हे पदार्थ सर्वाधिक लोकप्रिय पदार्थ आहेत. लिंबाचा वापर डाळ करी आणि सूप मध्येही केला जातो. कोशिंबीर बनवण्यासाठी आपल्याला लिंबूदेखील आवश्यक आहे.लिंबू पोषक तत्वांचा संग्रह म्हणून ओळखला जातो. लिंबूमधून आपल्याला  व्हिटॅमिन सी मिळत असते, म्हणूनच रोग प्रतिकारशक्तीसाठी त्यास आहारात समाविष्ट करणे फार चांगले आहे. यातील फोलेट नावाचा घटक हा प्रजनन क्षमतेसाठी आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, नियमितपणे लिंबूचे आहारात वापरला तर शरिराला आवश्यक असलेले पोटॅशियम मुबलक प्रमाणात मिळते.

लेमन  चहासारख्या पेयांद्वारे शरिराला लिंबाच्या रसामध्ये सापडणारे आम्ल मिळते, जे यकृत शुद्धीकरणास  मदत करते. जर तुम्ही जेवणानंतर लेमन चहा प्यायले तर ते पचन प्रक्रिया सुधारते. हे त्यामध्ये असलेल्या अँटि ऑक्सिडंट्समुळे होण्यास मदत  मिळते. लिंबूमधील घटक त्वचेच्या आजारांसाठी औषध म्हणून काम करतात आणि आपली  त्वचा निरोगी बनते.चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आणि चेहरा तेजस्वी बनविण्यासाठी लिंबू चांगले आहे. आहारात लिंबाचा नियमित समावेश असणे हृदय तसेच  आरोग्यासाठी खूप चांगला आहे. कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी लिंबाची क्षमता आधीच सिद्ध झाली आहे.

मायग्रेनपासून आराम मिळवण्यासाठी फक्त एक ग्लास लेमन चहा रोज घेणे भरपुर फायद्याचे ठरते. मधुमेह असलेल्या लोकांना रोज एक ग्लास लेमन ज्यूस पिण्याचा डॉक्टर सल्ला देतात, अशाप्रकारे रक्तातील साखर नियंत्रणात राहील. त्यात उदासीनता दूर करण्याची आणि तणाव, नैराश्य कमी करण्याची क्षमता  लिंबू मध्ये आहे.

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters