1. आरोग्य सल्ला

‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता माहिती करून घ्या

चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे,

गोपाल नरसिंग उगले
गोपाल नरसिंग उगले
‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता माहिती करून घ्या

‘ड’ जीवनसत्त्वाची कशी करावी पुर्तता माहिती करून घ्या

चेहरा, हात-पाय यांच्यावरती (उघाड्या अंगावर) पंधरा मिनिटे, आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा भरपूर सूर्यप्रकाश पडला तरी पुरेसे व्हिटॅमिन डी बनू शकते.तुम्हाला सारखेच गळून गेल्यासारखे वाटत असेल, दमल्यासारखे वाटत असेल, ऊठसूट कंबर, पाठ दुखत असेल, सारखेच आजारी पडत असाल किंवा कायम आजारीच असल्यासारखे वाटत राहत असेल, जखम बरी होत नसेल पायात किंवा इतरत्र पेटके येत असतील, स्नायू दुखत राहत असतील, दात ठिसूळ झाले असतील किंवा तुमचा चिडचिडेपणा वाढला असेल, पटकन तुम्ही नैराश्याची शिकार होत असाल किंवा रिपोर्टमध्ये कॅल्शियम कमी झाल्यासारखे दिसत असेल, तर तुम्ही नक्कीच खात्री करून घेतली पाहिजे की तुमच्या शरीरातील ‘ड’ जीवनसत्त्व कमी तर नाही ना झाले?लहान मुलांच्या बाबतीत याशिवाय दोन तक्रारींनी ‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव असावा असे संकेत मिळतात. जसे की - हवे तेवढे वजन न वाढणे किंवा वाढीचे टप्पे गाठण्यात अडथळा येणे.

‘ड’ जीवनसत्त्वाचा अभाव का येतो याचा विचार केला तर काही गोष्टींकडे लक्ष द्यावे लागते. ‘ड’ जीवनसत्त्व हे निसर्गतः कातडीखाली सूर्यकिरणांतील अल्ट्रावॉयलेट किरणांमधल्या बी बँडमुळे तयार होत असते, यामुळेच याला ‘सनशाइन व्हिटामिन’ असेही म्हटले जाते. याला कोलेकॅलसीफेरॅाल (D3) असे म्हणतात.ड’ जीवनसत्त्व सुदैवाने निसर्गामध्ये सूर्यप्रकाशामुळे भरपूर उपलब्ध असले तरीदेखील ते सहजासहजी कोणकोणत्या अन्नातून मिळू शकेल याचा विचार करणे यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाची रेलचेल असते.‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता भासू नये यासाठी काही अन्नपदार्थामध्ये जाणीवपूर्वक ‘ड’ जीवनसत्त्व मिसळलेले असते. उदाहरणार्थ काही तृणधान्ये व कडधान्ये, नैसर्गिक मश्रूम (अळंबी) मध्येही भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते. ‘ड’ जीवनसत्त्व हे तेलात विरघळणारे असल्यामुळे ते अन्नाबरोबर किंवा अन्नानंतर घेतले तर त्याचे शोषण चांगले व पटकन होते.‘ड’ जीवनसत्त्व नक्की करते तरी काय?पॅराथायरॉइड नावाचा हार्मोन हाडाची एकसंधता तोडण्याचे काम करत असतो.

या हार्मोनला प्रतिबंध झाल्यास हाडांचे आरोग्य वाढते.‘ड’ जीवनसत्त्वाचा या क्रियेमध्ये फार मोठा हातभार असतो. ऑस्टियोब्लास्ट (हाडे बांधणाऱ्या पेशी) आणि ऑस्टियोक्लास्ट (हाडे शोषणाऱ्या पेशी) या दोन्हींच्या योग्य कामासाठी, त्यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते.असे झाले तरच हाडांचे आरोग्य व्यवस्थित राहते आणि हाडे बळकट बनतात. कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम हे शरीरातील सर्व रासायनिक क्रियांसाठी आवश्यक घटक असतात यांचे शोषण ‘ड’ जीवनसत्त्वाशिवाय होऊ शकत नाही. शरीरातील प्रत्येक पेशीची वाढ ते तिचा मृत्यू या प्रवासासाठी ‘ड’ जीवनसत्त्वाची आवश्यकता असते. आयुर्मर्यादा वाढविणे, प्रतिकार शक्ती वाढवणे, चिंता आणि नैराश्य कमी करणे यामध्येही ‘ड’ जीवनसत्त्वाची महत्त्वाची कामगिरी असते. कातडीचे संरक्षण, कातडीचे वार्धक्य कमी करणे आणि कातडीचा कायाकल्प यामध्ये ‘ड’ जीवनसत्त्वाचा मोठा सहभाग असतो.ड’ जीवनसत्त्व गंभीर स्वरुपात कमी झाल्यास कॅल्शियम, फॉस्पेट्स कमी होतात, वाढीचे वय असलेल्या लहान मुलांमध्ये रिकेट्स ( मुडदूस) होतो ज्यामध्ये हाडे अधू , मऊ होतात. प्रौढांमध्ये

ऑस्टिओमलेशिया (हाडे मऊ होण्याची प्रक्रिया झाल्याने) हाडांची घनता कमी होते, अस्थिभंगाची शक्यता वाढते.ड’ जीवनसत्त्वाच्या अभावाने मोठा आजार होण्याआधीच प्रथमदर्शनी तक्रारही नाहीत किंवा कोणतीही लक्षणे नाहीत अशी परिस्थितीच जास्त करून दिसून येते. यामध्ये आतड्यातून शरीरातील कॅल्शियमच्या शोषणाचे प्रमाण कमी झाल्याने हाडांची घनता कमी होते, हाडे पातळ करणाऱ्या पॅराथायरॉइड हार्मोन ची शरीरातील पातळी वाढते आणि छोट्याश्या पडझडीमुळे देखील अस्थिभंग होऊ शकतो.‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता शरीरामध्ये झाली आहे हे शोधून काढण्यासाठी रक्तामधील ‘ड’ जीवनसत्त्वाची पातळी मोजता येते. कमतरता असल्यास तातडीने औषधयोजना आवश्यक असते. औषधोपचार करताना ‘ड’ जीवनसत्त्वाचा चुकून जास्त डोस दिला गेला तर कॅल्शियम शरीरामध्ये साठून राहते. त्याचा परिणाम म्हणून खूप तहान लागणे, भूक मंदावणे, हाडे दुखणे, शौचाला खडा होणे, अशक्तपणा वाढणे, मळमळ होणे, बोलताना शब्द बोबडे येणे, पोटात कळा येणे, अंग दुखणे, तोल जाणे सारख्या तक्रारी येतात.

 

संकलन- निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे.

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Learn how to take Vitamin D. Published on: 11 July 2022, 07:01 IST

Like this article?

Hey! I am गोपाल नरसिंग उगले. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters