उन्हाळ्याच्या सिजन ला आपण अनेक वेगवेगळ्या फळांचे रस पित असतो यामध्ये आंबा, अननस, स्ट्रॉबेरी, कलिंगड यांचे प्रमाण जास्त असते. लोकांच्या आवडीनिवडीनुसार लोक फळांचा रस पित असतात. परंतु अनोख्या स्वादामुळे लोकांच्या आवडीस उतरलेले फळ म्हणजे किवी हे आहे.या फळाची चव ही आंबट गोड आणि तिखट सुद्धा असतो. इतर फळांच्या तुलनेत किवीचे फळ हे खूप वेगळे असते. तसेच आरोग्यासाठी खूपच लाभदायक असते. आरोग्यदायी असल्याने किवी ला बाजारात प्रचंड मागणी सुद्धा आहे. इतर फळांच्या तुलनेत हे फळ महाग सुद्धा आहे.
१२ महिने हे फळ उपलब्ध :
किवि च्या फळात अनेक जीवनसत्त्वे आढळून येतात त्यामध्ये व्हिटॅमिन सी, के, ई, फॉलेट आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात आढळते. याशिवाय फळामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात. तसेच फायबर चा उत्तम स्रोत म्हणून किवीला ओळखले जाते. प्रामुख्याने किवीचे उत्पादन हे भारताबरोबर चीन, न्यूझीलंड, इराण, चिली,कॅलिफोर्निया या देशात घेतले जाते त्यामुळे बारमाही हे फळ बाजारात उपलब्ध असते.
किविचा रस पिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे:-
1) पचनक्रिया सुधारते:-
किविचा रस आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतो किविचा रस पिल्यामुळे पचनक्रिया एकदम व्यवस्थित आणि सुरळीत राहते. कारण किवी मध्ये फायबर चे प्रमाण मोठ्या प्रमाणात असते जे की शरीरासाठी फायदेशीर असते.
2)रोगप्रतिकारक शक्ती वाढते:-
किवी फळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची पोषक तत्वे आढळून येत असतात. किवीमध्ये फायबर तसेच व्हिटॅमिन सी, के, ई, फॉलेट आणि पोटॅशिअम मुबलक प्रमाणात आढळून येत असल्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
3)डोळ्यांची दृष्टी मजबूत आणि तीक्ष्ण राहते:-
मॅक्युलर डिजनेरेशन मुळे आपल्या डोळ्यांची नजर कमी होत असते. त्यामुळं किविचा रस पिल्यामुळे किंवा दिवसातून 3 किवीचे फळे खाल्ल्यामुळे मॅक्युलर डिजनेरेशन चा धोका निम्म्याहून कमी होतो.
4)शरीरातील रक्त गोठण्याचे प्रमाण कमी होते:-
किवीचे सेवन केल्यामुळे आपल्या शरिरातील रक्त गोठणे कमी करण्यात देखील मदत करते. दररोज 2 ते 3 किवींचे सेवन केल्याने रक्त गोठणे कमी होण्यास मदत होते. शिवाय हृदय विकारासारखे आजर सुद्धा कमी होतात.
5) रक्तदाब नियंत्रणात राहतो:-
किवी चे सेवन केल्यामुळे रक्तदाबाचा त्रास नाहीस होतो. तसेच दिवसातून तीन किवी खाल्ल्याने रक्तदाब कमी होण्यास अधिक मदत होते. किवीचे नियमित सेवन केल्यास स्ट्रोक आणि हृदयविकाराचा झटका यांसारख्या उच्च रक्तदाबामुळे होणाऱ्या आजारांचा धोका टळतो.
Share your comments