आपल्याकडे जेवणात एक ठरलेला पदार्थ असतो तो म्हणजे लोणचं. लोणचं हे खूप लोकांना आवडत. लोणची ही अनेक प्रकारची असतात आंब्याच लोणचं, कडुलिंब लोणचं, मिरची चे लोणचे, आवळ्याचे लोणचे आणि लिंबाचे लोणचे अशी अनेक प्रकारची लोणची आपणास पाहायला मिळतात.
लहान मुलं ते वयोवृद्ध लोकांपर्यंत सर्व लोणच्याचे दिवाणे आहेत खायला चमचमीत असल्यामुळे अनेक लोक त्याकडे आकर्षित होतात. लोणच्याची चव ही आंबट तिखट असल्याने त्याचे वेड सर्वच लोकांना आहे. बऱ्याच वेळी आजारी पडल्यावर आपल्याला लोणचे खाऊ नये असे सांगितले जाते परंतु तुम्हाला माहितेय का लिंबाचे लोणचे खाल्ल्यावर आपणास कोणकोणते फायदे होतात ते तर चला तर जाणून घेऊ.
हेही वाचा:-या वयोगटातील महिलांना असतो सर्वात जास्त हार्ट अटॅक चा धोका, जाणून घ्या लक्षणे
शरीरातील रक्ताभिसरण सुधारते:-
लिंबाचे लोणचे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.लिंबाच्या लोणच्यात आढळनारे गुणधर्म आपले रक्ताभिसरण सुधारण्यात मदत करतात. त्यामुळे आपणाला अधिक उत्साही, उर्जादायी वाटते. पण त्याचाही अतिरेक करू नये. रोजच्या जेवणात मुरलेल्या लिंबाच्या लोणच्याच्या २ ते ३ फोडी असणं पुरेसं ठरतं. तसेच लोणच्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, मॅग्नेशियम हे उपयुक्त घटक मुबलक प्रमाणात आढळतात.
हाडे मजबूत होण्यास मदत होते:-
लिंबाच्या लोणच्यामद्ये लोह, कॅल्शियम आणि पोटॅशियम हे शरीरास उपयुक्त असलेले घटक मिळतात. यामुळे हाडे ठिसून होण्याची समस्या कमी होऊन हाडे मजबूत होण्यास मदत होते. त्यासाठी आहारात दिवसातून 1 तरी लोणच्याची फोड नक्की खावी.
रोगप्रतिकारशक्ती वाढते:-
लिंबाच्या लोणच्यातले व्हिटॅमिन बी रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनक्रिया वाढविण्यास मदत करते. तसेच लिंबाच्या लोणच्यामध्ये ॲण्टी इन्फ्लेमेटरी गुणधर्मही मोठ्या प्रमाणात असतात.
तोंडाची चव गेल्यास:-
जर का तुमच्या तोंडाची चव गेली असेल, तर तुम्ही आहारात लिंबाच्या लोणच्याच सेवन करा त्यामुळे तुमच्या तोंडाला चव येईल.गरोदर पणात स्त्रियांनी लिंबाच्या लोणच्याच सेवन करणे फायदेशीर असते.
Share your comments