कोणत्याही व्यक्तीचे व्यक्तीमहत्त्व सुंदर दिसण्यासाठी उंची आणि वजन हे दोन घटक खूप महत्वाचे असतात. कारण 100 लोकात उठून दिसण्यासाठी व्यक्तिमहत्व गरजेचे आहे. आजकाल काही लोकांची उंची जास्त आहे तर काही लोकांचं वजन जास्त आहे तर चला या लेखात आपण उंचीनुसार किती वजन असायला हवे हे पाहणार आहोत.
प्रत्येक माणसाची इच्छा असते की आपण परफेक्ट आणि फिट असावं. परफेक्ट आणि फिट राहण्यासाठी लोक अनेक उपाययोजना करत असतात. आजकाल तर लोक वजन कमी करण्यासाठी अजब आणि गजब पर्याय निवडत आहेत ते तुम्हाला माहीतच असेल.
IBW फॉर्म्युला:-
वजन मोजण्यासाठी खालील फार्म्यूला वापरा IBW ची गणना करण्यासाठी विविध पद्धती आणि सूत्रे वापरली जाऊ शकतात. तुम्ही तुमच्या IBW पेक्षा 30% जास्त असल्यास तुम्हाला लठ्ठ किंवा तुमचे वजन जास्त असल्याचे मानले जाईल.
पुरुष: IBW (kgs) = 22 × (मीटरमध्ये उंची)2
महिला: IBW (kgs) = 22 × (मीटरमध्ये उंची − 10 सेमी)2 याच्या आधारे तुमचे वजन आणि उंची योग्य आहे की नाही हे समजले जाते.
या आधारे ओळखा तुमचे वजन योग्य आहे की नाही:-
उंची प्रमाणे परफेक्ट वजन किती असावं याचा तपशील खाललप्रमाणे आहे:-
4 फूट 10 इंच - 41 ते 52 किलो
5 फूट - 44 ते 57 किलो
5 फूट 2 इंच - 49 ते 63 किलो
5 फूट 4 इंच - 49 ते 63 किलो
5 फूट 6 इंच - 53 ते 67 किलो
5 फूट 8 इंच - 56 ते 71 किलो
5 फूट 10 इंच - 59 ते 75 किलो
6 फूट - 63 ते 80 किलो
ही आहेत योग्य उंचीनुसार योग्य वजन.
Share your comments