सर्वसाधारणपणे हिवाळ्याच्या दिवसात कोवळा हरभरा येण्यास सुरू होते. हरभरा चे घाटे लहान - मोठे असले तरी चवीला रुचकर लागतात. हरभरा पासून आपल्या घरातील गृहिणी वेगवेगळे रुचकर पदार्थ तयार करत असतात.जसे की हरभरा पीठ, फुटाणे अशा प्रकारचे विविध पदार्थ हरभरा पासून तयार होत असतात. फक्त पदार्थ च न्हवे तर हरभरा हे एक औषध म्हणून सुद्धा उत्तम काम करते.
हरभरा खाल्ला तर अशक्तपणा दूर:
हरभराचा जो आंबट आहे तो आपल्या पचनक्रियेवर उत्तम कार्य करतो. जेवण केल्यानंतर अजीर्णपणा होत असेल किंवा अपचन असो अथवा गॅस होवो यावर गुणकारी औषध म्हणून हरभरा कडे पाहिले जाते. तुम्हाला जर अशक्तपणा वाटत असेल किंवा आजारी असलो की अशक्तपणा येतो त्यावेळी तुम्ही हरभरा खाल्ला तर अशक्तपणा दूर होईल. कोवळा हरभरा यावेळी भाजून खावा जो की आपल्या शरीरासाठी पौष्टिक असतो.
हरभरा चे फायदे:-
१. हरभरा चे पीठ तुम्ही साय, दूध किंवा मधामध्ये मिक्स करा आणि त्याचा लेप करून चेहऱ्याला लावा. लेप वाळला की काढून टाका त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक दिसेल.
२. तुमच्या त्वचेला खाज येत असेल तर अंघोळी वेळी हरभरा चे पीठ दुधामध्ये टाकून लावा त्यामुळे थोड्याच दिवसात खाज कमी होईल आणि नंतर कायम बंद होईल. मात्र साबण टाळा.
३. सर्दी झाल्यानंतर घशात कफाचा चिकटपणा राहतो त्यावेळी थोडे फुटाणे घेऊन खावा मात्र वरून पाणी पिऊ नका.
४. रात्री कफाचा खोकला येत असेल तर फुटाणे खाऊन झोपा त्यामुळे कफ कमी येतील.
५. हरभरे भिजत घालून त्याला मोड आले की ते खावा त्यामुळे अंगात ऊर्जा प्राप्त होईल.
६. सर्दी जास्त झाली किंवा नाक वाहत असेल तर फुटाणे खावा.
७. हरभरा पचायला जड असतो त्यामध्ये पीठ आणि भिजवलेली डाळ त्यामुळे पोट जड होते. जर पचनशक्ती उत्तम असेल तर त्यांनी जरूर सेवन करावे नाहीतर तुम्हाला त्रास होईल.
हे पथ्य पाळावे लागतील:-
१. जेवण केल्यानंतर हरभरा खायचा असेल तर जेवणाची वेळ निश्चित करा.
२. जेवण झाल्यानंतर पाणी गरम प्यावे.
३. मांसाहार पचवण्याची ताकत तुमच्यामध्ये असेल तर तुम्ही १५ - २० दिवसातून खाऊ शकता.
४. जरी हरभरा पौष्टिक असला तरी सुद्धा तुमची पचनशक्ती उत्तम राहण्यासाठी तुम्हाला हे पथ्य पाळावे लागतील.
अशा प्रकारे घ्या काळजी:-
१. तुम्हाला जर सारखी सर्दी, कफ तसेच खोकला असला तर तुम्ही डॉक्टर चा सल्ला घ्या.
२. नेहमीची जी औषधे आहेत ती औषधे सुरूच ठेवा पण त्याबरोबर फुटण्यानच औषधे सुरू ठेवा. हरभरा मध्ये असे औषधे गुणधर्म आहेत जे यावर प्रक्रिया करतात.
Share your comments