काजू एक महत्वाचे ड्रायफ्रुट्स म्हणून ओळखले जाते. अनेक लोक काजूचे सेवन करतात, काजू खाणे जवळपास सर्वच लोकांना आवडते. आहार तज्ञांच्या मते, काजुमध्ये असणारे औषधी गुणधर्म मानवी शरीरासाठी खूपच उपयोगी असतात. तसं बघायला गेलं तर काजू कधीही खाल्ला तरी त्यापासून शरीराला लाभ मिळत असतो. मात्र जर काजू सकाळी अनाशेपोटी खाल्ला तर त्यापासून जास्त अधिक फायदा मानवी शरीराला मिळत असतो. सकाळी अनशापोटी काजू खाल्ल्याने आपले शरीर अनेक रोगांना दूर ठेवते यामुळे मानवी शरीराची रोगप्रतिकारक क्षमता कमालीची वाढते.
काजूमध्ये एंटीऑक्सीडेंट मोठ्या प्रमाणात आढळतात हे अँटिऑक्सिडंट आपल्या शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. काजूमध्ये अँटिऑक्सिडंट व्यतिरिक्त विटामिन ए, सी, बी6, कैल्शियम, फाइबर, फॉस्फोरस, आयरन, पैटैशियम, प्रोटीन, जिंक, सोडियम, मैग्नीशियम यांसारखे विटामिन्स आणि खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. काजुमध्ये आढळणारे विटामिन्स आणि खनिजे मानवी शरीरासाठी खूपच फायदेशीर असतात. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सकाळी सकाळी अनाशेपोटी काजू खाल्ल्याने होणारे फायदे.
सकाळी सकाळी अनशापोटी काजू खाल्ल्याने होणारे फायदे
हाडे मजबूत होण्यास फायदेशीर
ज्या लोकांची हाडे ठिसूळ असतात अशा लोकांनी सकाळी सकाळी अनशापोटी अर्थात रिकाम्यापोटी काजूजे सेवन केल्यास हाडे मजबूत होण्यास मदत होते. कॅल्शियम मानवी शरीराची हाडे मजबूत करण्यास मदत करत असते आणि काजू मध्ये मोठ्या प्रमाणात कॅल्शियम आढळतो त्यामुळे काजू चे सेवन मानवी शरीराची हाडे मजबूत करण्यासाठी विशेष फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. तसेच ऑस्टियोपोरोसिसची समस्या असलेल्या लोकांनी याचे सेवन केल्यास त्यांना याच्या त्रासापासून कायमची मुक्ती मिळते.
पाचन तंत्र सुधारण्यास मदत करते
असे सांगितले जाते की, मानवाचे पाचन तंत्र जर सुरळीत राहिले तर मानवी शरीराला कुठलाच रोग लागत नाही. पाचन तंत्र मजबूत असल्याने मानवाचे शरीर सर्व प्रकारच्या रोगांपासून लढण्यास सक्षम बनते. काजूचे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने पाचन तंत्र सुधारते. काजूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर आढळतात जे की मानवी शरीरातील बद्धकोष्टते सारखा आजार दूर ठेवण्यास मदत करते.
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी ठरते फायदेशीर
अनेक लोकांना रक्ताची कमतरता भासत असते अशा लोकांनी काजू चे सेवन केल्यास रक्ताची कमतरता दूर होऊ शकते. ज्या लोकांना ॲनिमिया म्हणजेच रक्ताची कमतरता असते अशा लोकांनी सकाळी सकाळी रिकाम्या पोटी काजूचे सेवन केले पाहिजे यामुळे रक्ताची कमतरता दूर होते. काजुमध्ये आयरन मोठ्या प्रमाणात असल्याने याचे सेवन ऍनिमिया सारखे आजार दूर ठेवण्यास मदत करते.
Disclaimer: सदर आर्टिकलमध्ये दिलेली माहिती हा एक प्राथमिक सल्ला आहे. हे आर्टिकलं केवळ सामान्य माहिती प्रदान करते, याचा कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय सल्ला म्हणून स्वीकार करू नये. अधिक माहितीसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Share your comments