बरेच शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय करतात. आता कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या विविध प्रकारच्या जाती पाळल्या जातात.
गावरान तर आधीपासूनच पाळली जाते पण त्यासोबतच ब्रॉयलर देखील आता पोल्ट्री उद्योगाच्या माध्यमातून नावारूपास येत आहे. परंतु यामध्ये कडकनाथ या जातीच्याकोंबड्या देखील मोठ्या प्रमाणात पाहिल्या जात आहेत. आपल्याला माहित आहेच की या जातीच्या कोंबडीचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे या कोंबडीचे मांस हे काळ्या रंगाचे असते. एवढेच नाही तर यांच्या रक्त सुद्धा काळे असते.या जातीचे स्थानिक नावे काला मासी असे आहे.जर या जातीच्या कोंबडीची उगम स्थान याचा विचार केला तर ते मध्यप्रदेश राज्यातील आहे.
या जातीची कोंबडी मध्यप्रदेशातील गरीब लोक, तिथे राहणारे ग्रामीण लोक तसा आदिवासी इत्यादी मोठ्या प्रमाणात पालन करतात.या कोंबडी मध्ये खूपच औषधी गुणधर्म असल्याचे देखील सांगितले जाते.
कडकनाथ कोंबडीचे आरोग्यदायी महत्त्व
- कडकनाथच्या औषधी गुणांचा वापर हा सेंट्रल फूड रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर यांनी केला आहे. हृदयाच्या रुग्णांना फायदेशीर ठरला असल्याचे सिद्ध झाले आहे.
- मांसातील प्रथिनांचे प्रमाण 25 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
- या जातीच्या मांसामध्ये कोलेस्टेरॉल कमी असते.
- बी वर्गातील जीवनसत्वे जसेकी बी 1,बी 2, बी 6 आणि बी 12, सी आणि ई असे बरेच प्रकारची जीवनसत्त्वे आहेत.
- कॅल्शियम,फॉस्फरस,निकोटिनिक आम्ल, लोह, प्रथिने,चरबीयांचे प्रमाण चांगले आहे.
- टीबी,दमा आणि फुफुसा संबंधित विकार टाळण्यासाठी हे काळे मांस उत्तम ठरले आहे.
- या जातीचे मूळ गाव काळा मासी आहे.
Share your comments